Kolhapur Politics : काँग्रेस निष्ठावंतांचे पूत्र अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाणार, आधी फक्त चर्चा आता बॅनरमधून दिले स्पष्ट संकेत

Rahul Patil Join NCP : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि दिवंगत आमदार पी.एन पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील हे राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या कोल्हापुरात सुरू आहे. मात्र, गेले अनेक दशके काँग्रेससोबत पाटील गट हा निष्ठावंत आहे.
Rahul Patil
Rahul Patil seen with NCP leaders during a private meeting in Kolhapur, hinting at a major political switch from CongressSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 22 Jul : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि दिवंगत आमदार पी.एन पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील हे राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या कोल्हापुरात सुरू आहे. मात्र, गेले अनेक दशके काँग्रेससोबत पाटील गट हा निष्ठावंत आहे.

त्यामुळे काँग्रेसची साथ कधीच सोडणार नाही अशी देखील चर्चा आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी राहुल पाटील यांच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.

अशातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल पाटील यांनी अजितदादांना शुभेच्छा देत पक्षप्रवेशाबाबत संकेत दिले आहेत. त्यामुळे राहुल पाटील हे येत्या काही दिवसात पक्षप्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Rahul Patil
Kolhapur Politics : अजितदादांचा शिलेदार धक्कादायक निर्णय घेणार, पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर 'हे' पदही सोडणार...

याबाबत ते काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, करवीर विधानसभा मतदारसंघातील निष्ठावंत पी.एन. पाटील गट यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राहुल पाटील यांच्या भूमिकेकडे सध्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

काँग्रेसचे निष्ठावंत नेते पी. एन. पाटील यांचे चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील हे भाजपमध्ये जाणार, या चर्चेने जिल्ह्यातील राजकारणाने लक्ष वेधले होते. त्यानंतर आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याबाबत पी. एन. पाटील यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत आहेत.

यामध्ये ‘निष्ठावंत’ कार्यकर्त्यांकडून काँग्रेस पक्ष सोडून इतरत्र जाण्यास ठाम विरोध केला जात आहे. तर, भोगावती कारखान्याला कर्ज मिळवण्यासह त्यांच्या राजकारणाला उभारी देण्यासाठी पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा, असा सूर काही कार्यकर्त्यांनी आळवला आहे.

Rahul Patil
Manikrao Kokate : CM फडणवीसांनी सुनावलं, पक्षानेही हात झटकले; पत्ते खेळतानाच्या व्हिडिओमुळे कोकाटेंचं मंत्रीपद जाणार?

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते ए.वाय. पाटील यांची राहुल पाटील यांनी एका हॉटेलमध्ये भेट घेत प्रवेशा संदर्भात चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भोगावती सहकारी कारखान्यात ए.वाय पाटील हे राहुल पाटील यांचे सहकार्य आहेत. या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील कार्यकर्त्यांची इच्छा काय आहे.

त्यांच्या नाराजीचा सूर कमी करण्यासाठी काय केले पाहिजे यासाठी विचारमंथन या बैठकीत झाल्याची माहिती आहे. मात्र भेटी दरम्यान राहुल पाटील हे राष्ट्रवादीतच प्रवेश करणार असल्याची भावना असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यात केवळ ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी पी. एन. पाटील यांच्यासोबत होती. सत्ता असो किंवा नसो, पी. एन. पाटील यांनी कार्यकर्त्यांसाठी शासकीय कार्यालयात केलेला फोन म्हणजे ‘एक कॉल आणि प्रॉम्बलेम सॉल्व्ह’ असाच होता. हे तरुण कार्यकर्ते आजही आपली वाहने, घर, खिशावर ‘निष्ठावंत’ असे लोगो किंवा बिल्ला लावून फिरत आहेत.

मात्र, राहुल पाटील यांच्याकडून कार्यकर्त्यांकडून जाणून घेत असलेल्या भूमिकेमुळे काही कार्यकर्त्यांनी काही दिवसांपासून हा लोगो बाजूला ठेवल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या निर्णयाबद्दल राधानगरी तालुक्यातील प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची आज बैठक झाली. यामध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या व तालुक्यातील आपले राजकीय भवितव्य काय, याची चाचपणी करून पुढील निर्णय घ्यायचा. यावर बहुतांश कार्यकर्त्यांचे एकमत झाले.

सतेज पाटील यांची घेणार भेट

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील या दोन दिवसात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. त्याबाबतची माहिती सतेज पाटील यांनी दिली आहे. सध्या राहुल पाटील हे मुंबईत आहेत. मुंबईतून आल्यानंतर ते पाटील यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com