Manikrao Kokate Controversy : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सतत वादग्रस्त वक्तव्य करत असतात. त्यांच्या या वक्तव्यांमुळे अजितदादांच्या पक्षाची बदनामी होत असल्याचं बोललं जात आहे.
अशातच आता कोकाटे यांचा पावसाळी अधिवेशनाच्या काळात थेट विधानसभेत मोबाईलमध्ये पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून विरोधकांनी कोकाटेंसह राज्य सरकारवर टीकेचे झोड उठवली आहे. कोकाटे यांच्या कृतीमुळे पक्षातील वरिष्ठ देखील नाराज झाले आहेत.
तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कोकाटेंवर नाराजी व्यक्त केली. "कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे वर्तन अतिशय चुकीचे होते आणि जो प्रकार घडला, तो भूषणावह नाही"; असं त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी देखील, "शेतकरी संकटात असताना कृषिमंत्र्यांचे वागणे चुकीचे होते. त्यांचे वर्तन नक्कीच चुकीचे होते. पक्ष त्यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेईल", असं सूचक वक्तव्य केलं आहे.
त्यांच्या या वक्तव्यामुळे आता अजित पवारांची राष्ट्रवादी यावेळी कोकाटेंना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार नसल्याचं दिसत आहे. दरम्यान, या आधीही कोकाटेंनी शेतकऱ्यांसदर्भात अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. तेव्हा त्यांच्या पक्षाने त्यांची पाठराखण केली होती. मात्र, आता विधानभवनात पत्ते खेळतानाच्या व्हिडिओमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा सूर राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी आवळला आहे.
दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. कोकाटेंनी व्हिडिओ संदर्भात याआधीच स्पष्टकरण दिलं आहे. त्यामुळे आता ते पुन्हा पत्रकार परिषद कशासाठी आणि का घेत आहेत? असा सवाल उपस्थित करत आहेत.
तर दुसरीकडे पक्षासह मुख्यमंत्र्यांनी दर्शवलेली नाराजी, विरोधकांकडून सातत्याने होणारी राजीनाम्याची मागणी, या सर्व पार्श्वभूमीवर कोकाटे आज राजीनामा देणार का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटेंच्या आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.