Sangli Politics : विश्वजीत कदमांनी पुन्हा दणका देताच 'देशमुख बंधूंचे' 'पॅचअप'; बड्या नेत्याने लक्ष घातलाच विमान जमिनीवर

Palus Kadegaon politics : पलूस-कडेगावमध्ये भाजप नेते पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख यांच्यातील वाद संपुष्टात येत पक्ष संघटना बळकट करण्यासाठी दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.
Prithviraj Deshmukh and Sangramsingh Deshmukh
BJP leaders Prithviraj Deshmukh and Sangramsingh Deshmukh reunite in Kadegaon after mediation, signaling renewed unity to strengthen the party organization in Palus-Kadegaon.Sarkarnama
Published on
Updated on

Palus Kadegaon BJP News : पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते पृथ्वीराज देशमुख आणि त्यांचे चुलत बंधू संग्रामसिंह देशमुख यांच्यातील भाऊबंदकीला पूर्णविराम मिळाला. कडेगाव येथे भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर देशमुख बंधूंमध्ये मनोमिलन झाले. कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर व पलूस-कडेगावात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सर्व मतभेद मिटल्याचे दोघांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून पृथ्वीराज देशमुख व त्यांचे चुलत बंधू संग्रामसिंह देशमुख यांच्यात टोकाचे मतभेद झाले होते. जाहीरपणे एकमेकांवर जोरदार टीकास्त्र डागत त्यांनी आपले राजकीय मार्ग वेगळे झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर दिवसेंदिवस त्यांच्यात दरी वाढत गेली. विकास कामांसाठी दोघांनीही स्वतंत्रपणे राज्यस्तरावरून तसेच जिल्हा नियोजन समितीतून निधी आणून विकास कामाचे स्वतंत्रपणे उद्‌घाटने व भूमिपूजने सुरु केली होती.

त्यानंतर मतदारसंघातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी यात मध्यस्थी करून देशमुख बंधूंमध्ये दिलजमाई करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्यामध्ये कार्यकर्त्यांना यश आले नव्हते. दोघांनीही आपला गट मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पलूस नगरपालिका निवडणुकीत देखील देशमुख बंधूंमधील वादाचा फटका बसला होता. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी एकहाती विजय मिळवत भाजपला पाणी पाजले होते. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाने पृथ्वीराज व संग्रामसिंह देशमुख यांच्यातील मतभेद मिटविण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या.

Prithviraj Deshmukh and Sangramsingh Deshmukh
Sangli ZP : सांगलीत जिल्हा परिषदेत महायुतीचा पेपर सोपा, महविकासचं मताधिक्य घटल्याने टेन्शन वाढलं

आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत या वादाचा फटका बसू नये यासाठी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांच्यावर देशमुख बंधूंतील मतभेद मिटविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्या अनुषंगाने त्यांनी कडेगाव येथे देशमुख बंधूंची एकत्र बैठक घेतली, यावेळी भाजपचे युवा नेते शरद लाड हे ही उपस्थित होते. प्रदीर्घ काळ चाललेल्या या बैठकीत अखेर देशपांडे यांना पृथ्वीराज व संग्रामसिंह देशमुख यांच्यात दिलजमाई करण्यात यश आले.

Prithviraj Deshmukh and Sangramsingh Deshmukh
Sangli ZP : संग्रामसिंह देशमुखांचा पत्ता कट तर सम्राट महाडिकांसाठी संधी

पलूस-कडेगावचे भाजप नेते पृथ्वीराज देशमुख व संग्रामसिंह देशमुख यांच्यातील अंतर आता पूर्णपणे संपुष्टात आले असून, त्यांच्यातील मतभेद मिटले आहेत. असे भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांनी सांगितले. तर पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात भाजप नंबर वन करण्यासाठी मतभेद बाजूला ठेवून यापुढेची वाटचाल करणार असल्याचा आशावाद माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केला. संग्रामसिंह देशमुख यांनीही कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर आणि पलूस-कडेगाव तालुक्यात पक्ष संघटना बळकट करून सगळ्या निवडणुकांत भाजपला यश मिळवून देण्यासाठी एकत्र येत आहोत, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com