Pandharpur Dhangar Agitation
Pandharpur Dhangar AgitationSarkarnama

Dhangar Agitation : धनगर आरक्षण आंदोलन; पाच उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली, एकजण चक्कर येऊन कोसळला

Pandharpur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची चर्चा होणार होती. मात्र, शिष्टमंडळातील आदित्य फत्तेपूरकर आणि विठ्ठल पाटील या दोन सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवर बहिष्कार घालून बैठकीला न जाण्याचा निर्णय जाहीर केला.
Published on

Pandharpur, 15 September : एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपुरात राज्यव्यापी बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येत आहे. उपोषणाचा आज सातवा दिवस आहे.

दरम्यान, आज सातव्या दिवशी सहा पैकी पाच उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली. यातील योगेश धरम हे चक्कर आल्याने जमिनीवर कोसळले, त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. उर्वरीत चौघांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.

पंढरपूरमध्ये (Pandharpur) गेल्या सात दिवसांपासून धनगर समाजाला (Dhangar Reservation) घटनेने दिलेल्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी उपोषण आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाच्या सहाव्या दिवशी सरकारच्या वतीने उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत आज धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची चर्चा होणार होती. मात्र, शिष्टमंडळातील आदित्य फत्तेपूरकर आणि विठ्ठल पाटील या दोन सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवर बहिष्कार घालून बैठकीला न जाण्याचा निर्णय जाहीर केला होता.

Pandharpur Dhangar Agitation
Bhagirath Bhalke : महाआघाडीच्या उमेदवारीबाबत प्रणिती शिंदेंचा हवाला देत भगीरथ भालकेंचा मोठा दावा...

धनगर आरक्षण उपोषण आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. गेली सात दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या उपोषणकर्त्यांच्या रक्तातील साखर कमी झाल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. सहा उपोषणकर्त्यांपैकी पाच जण अस्वस्थ झाले आहेत.

त्यातील योगेश धरम यांना चक्कर आल्याने ते जमिनीवर कोसळले. त्यांना पंढरपूरमधील खासगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. इतर चार उपोषण कर्त्यांनी उपचार घेण्यास नकार कळविला आहे. ते उपोषण करण्यावर ठाम आहेत.

Pandharpur Dhangar Agitation
Solapur News : ‘जरांगेंना शह देण्यासाठीच फडणवीसांची सुपारी घेऊन राजेंद्र राऊतांचे बार्शीत आंदोलन’

बहिष्काराची भूमिका योग्य नाही

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याची धनगर समाजाची भूमिका नाही. तो त्या दोघांचा वैयक्तिक निर्णय आहे. एवढ्या एक मुद्दा सोडला तर आमच्यात कोणताही वाद अथवा मतभेद नाहीत. दहा जणांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार होते. मात्र, त्या दोघांनी बैठकीला न येण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवर बहिष्कार टाकून वेगळा निर्णय जाहीर करणे, योग्य नाही, अशी भूमिका धनगर समाजाचे समन्वयक प्रा. सुभाष मस्के यांनी मांडली.

सरकार आश्वासन पाळत नाही

सरकारने यापूर्वी अनेकदा आश्वासने दिली आहेत. पण ती पाळली नाहीत, त्यामुळे आम्ही (मी आणि विठ्ठल पाटील ) मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. आता मुख्यमंत्र्यांनीच पंढरपूरमध्ये येऊन धनगर आरक्षण आंदोलकांशी चर्चा करावी, अशी मागणी आदित्य फत्तेपूरकर ( सदस्य, धनगर शिष्टमंडळ, पंढरपूर) यांनी केली.

Edited By ; Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com