Bhagirath Bhalke : महाआघाडीच्या उमेदवारीबाबत प्रणिती शिंदेंचा हवाला देत भगीरथ भालकेंचा मोठा दावा...

Pandharpur Assembly Constituency : महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच भगीरथ भालकेंनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. महाआघाडीकडून उमेदवारी मिळाली नाही तर आपण निवडणूक लढवणारच असे त्यांनी जाहीर केले आहे.
Bhagirath Bhalke-Praniti Shinde
Bhagirath Bhalke-Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 15 September : पंढरपूर-मंगळेवढा मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार, याची सर्वाधिक उत्सुकता असताना भगीरथ भालके यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या हवाल्याने मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून तुम्ही कामाला लागा, असे आदेश खासदार शिंदे यांनी दिल्याचे भालके यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार, हे अद्याप निश्चित नाही. मात्र, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची बहुतांश इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. यात भगीरथ भालके यांनी दोन वेळा शरद पवार यांची भेट घेतली आहे. महाविकास आघाडीकडून विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच भगीरथ भालकेंनी (Bhagirath Bhalke) विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली नाही तर आपण निवडणूक लढवणारच असे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे पंढरपूरमधून महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार, हा औत्सुक्याचा विषय ठरला आहे.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे तथा भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनीही राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांची भेट घेतली आहे. तसेच, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत एकत्रित प्रवासही केला आहे. त्यामुळे पंढरपूरच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी सावंतही रिंगणात आहेत.

Bhagirath Bhalke-Praniti Shinde
Mohol NCP : सर्वाधिक सुरक्षित मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादीची धाकधूक का वाढली?

दुसरीकडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे उजवे हात मानले जाणारे नागेश भोसले यांनीही विधानसभेच्या उमेदवारीसाठी जयंत पाटील आणि शरद पवार यांची भेट घेतली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख यांनीही विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त करत शरद पवारांना भेटले आहेत.

दरम्यान, हे सर्व इच्छुक असतानाच माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर त्यांच्या समर्थकांकडून राष्ट्रवादीची उमेदवारी घ्यावी, यासाठी दबाव वाढत आहे. मात्र, परिचारकांनी अद्याप आपले पत्ते ओपन केलेले नाहीत, त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी सर्वाधिक चुरस दिसून येत आहे.

Bhagirath Bhalke-Praniti Shinde
Solapur News : ‘जरांगेंना शह देण्यासाठीच फडणवीसांची सुपारी घेऊन राजेंद्र राऊतांचे बार्शीत आंदोलन’

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडील इच्छुकांची संख्या पाहता तुतारी कोणाला मिळणार, हा खरा प्रश्न आहे. पवारांना भेटूनही ग्रीन सिग्नल मिळत नसल्याचे पाहून अखेर भगीरथ भालकेंनी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे.

जन आशीर्वाद यात्रेच्या कार्यक्रमात बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी मोठ्या मेळाव्यात मला महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून कामाला लागा, असे स्पष्ट आदेश दिले आहेत, असा दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठीची चुरस वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com