Pandharpur News : पंढरपुरात आज (शनिवारी) ओबीसी एल्गार मेळावा होत आहे. त्यासाठी अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासह दिग्गज ओबीसी नेते पंढरपुरात दाखल होत आहेत. आजच्या मेळाव्यात छगन भुजबळ काय बोलतात याकडेच लक्ष लागले आहे.आक्रमक नेते असलेले भुजबळ यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'केला. आपण शिवसेना का सोडली यांचे कारण भुजबळांनी आज (शनिवार) पंढरपुरात सांगितले.
"मी आमदार, मंत्री असण्यापूर्वी ओबीसी आहे. मी फक्त ओबीसींसाठी काम करतोय. ओबीसींसाठी मी शिवसेना सोडली," असे भुजबळांनी सांगितले. 'ओबीसींच्या मुद्दांवरुन काही विशेष लोकांनी मला टार्गेट केले आहे," असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. बीडमधील जाळपोळीच्या घटनेआधी मी कुणालाच काहीच बोललो नाही, असेही ते म्हणाले.
पंढरपुरातील टिळक स्मारक मैदानावर दुपारी तीन वाजता ओबीसी मेळावा होत आहे. या मेळाव्यास भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेते मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याकडे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मेळाव्याच्या निमित्ताने भुजबळ हे आज दिवसभर पंढरपुरात आहेत. सकाळी त्यांनी विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन घेतले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे-पाटील आणि ओबीसी आरक्षण बचाव एल्गार परिषदेतून त्यांच्यावर कडाडून टीका करणारे छगन भुजबळ यांच्यात जुंपली आहे.
मेळाव्याचे संयोजक आमदार गोपीचंद पडळकर असून ते मेळाव्यात शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. टिळक स्मारक मंदिर पटांगणावर बारा महिने असणारे सर्व फेरीवाले, भेळवाले यांचे गाडे येथून हलविण्यात आले आहे. मैदानात ओबीसी नेत्यांचे डिजिटल फलक लागले आहेत. काही महिन्यापूर्वी याच मैदानाच्या मागच्या बाजूला असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे यांची सभा झाली होती. जरांगेंना उत्तर देण्यासाठी याच भागात ओबीसी मेळावा होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.