Bazar Samiti Election : माढ्यात शिंदे बंधू विरोधात सावंत बंधूंमध्ये काँटे की टक्कर : संजय शिंदेंच्या उमेदवारीने चुरस; साठेंची भूमिका निर्णायक

माजी आमदार धनाजीराव साठे गटाने निवडणुकीतून माघार घेतली आहे.
Tanaji Sawant, Shivaji Sawant, Babanrao Shinde, Sanjay Shinde
Tanaji Sawant, Shivaji Sawant, Babanrao Shinde, Sanjay ShindeSarkarnama

माढा (जि. सोलापूर) : माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती (Bazar Samiti) कुर्डूवाडीची निवडणुक (Election) दुरंगी होणार हे आता स्पष्ट झाले आहे. आमदार शिंदे बंधूंच्या विरोधात प्रा. शिवाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनेल असा सामना आहे. शिंदे बंधूंचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे, तर माजी आमदार धनाजीराव साठे गटाने निवडणुकीतून माघार घेतली आहे. मागील काही निवडणुका बिनविरोध होण्याची परंपरा यानिमित्ताने खंडित झाली आहे. (Panel of Sawant brothers against Shinde brothers for Kurduvadi Bazaar Samiti)

माजी आमदार धनाजीराव साठे व शेकापचे बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील‌ सर्वच उमेदवारांनी माघारीच्या शेवटच्या दिवशी (ता. २० एप्रिल) अर्ज मागे घेतल्याने आमदार शिंदे बंधू विरोधात सावंत-कोकाटे यांच्या उमेदवारांमध्ये दुरंगी लढत होत आहे. ग्रामपंचायत मतदारसंघातील अनुसूचित जाती जमातीसाठीच्या जागेवर आमदार शिंदे बंधूंच्या गटाचे रामभाऊ वाघमारे हे बिनविरोध निवडून आले आहेत. माघारीच्या शेवटच्या दिवशी ९७ जणांनी अर्ज मागे घेतले.

Tanaji Sawant, Shivaji Sawant, Babanrao Shinde, Sanjay Shinde
Bazar Samiti Election : मंगळवेढ्यात काका-पुतण्याची बाजी : भालके-परिचारकांच्या समविचाराचे स्वप्न धुळीस

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच शिंदे विरुद्ध सावंत अशी निवडणूक रंगली आहे. यानिमित्ताने या दोन्ही गटाच्या ताकदीची परीक्षा पाहायला मिळणार आहे. साठे गटाने या अगोदरच्या निवडणुकांमध्ये आमदार शिंदे बंधूंच्या गटाबरोबर तडजोडीची भूमिका घेतली होती. यावेळी मात्र साठे गटाने दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून या निवडणुकीत साठे हे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या परिवर्तन पॅनेलकडे जाणार की आमदार शिंदे बंधूंकडे जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Tanaji Sawant, Shivaji Sawant, Babanrao Shinde, Sanjay Shinde
Sangola News : गणपतराव देशमुखांच्या निधनानंतर सांगोल्यात बिनविरोधची परंपरा खंडीत : नेत्यात एकी; कार्यकर्त्यांत बेकी

आमदार संजय शिंदे हे सर्वसाधारण सहकारी संस्थामधून स्वतः निवडणूक लढवत असल्याने आमदार शिंदे बंधूंसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांचे बंधू प्रा. शिवाजी सावंत हे या निवडणुकीत सुरुवातीपासून सक्रिय आहेत. शिवसेनेचे संजय कोकाटे यांनी आमदार शिंदे यांचे विरोधक प्रा. शिवाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित करण्याचे काम केले आहे. राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या प्रा. सावंत यांनी या निवडणुकीला महत्त्व दिलेले आहे. या सर्व घडामोडी पाहता बाजार समितीची ही निवडणूक भविष्यातील निवडणुकांची पायाभरणी ठरणारी आहे.

Tanaji Sawant, Shivaji Sawant, Babanrao Shinde, Sanjay Shinde
Bazar Samiti Election : नीरेत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी; ठाकरे गटाला एकही जागा नाही : आघाडीला युती देणार टक्कर

कामाची पोहोच पावती मिळेल : बबनराव शिंदे

या निवडणुकीत करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे पॅनेलचे नेतृत्व करीत आहेत. निवडणूकच्या निमित्ताने मतदारांपर्यंत जाता येईल. अडीअडचणी समजून घेता येतील. आमचा विजय निश्चितच असणार आहे, असे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले.

जनता नक्कीच परिवर्तन घडवेल : संजय कोकाटे

जनतेच्या हातात निवडणुका गेल्या की अनेक दिग्गज नेतेमंडळींचा पराभव होतो. हे अनेक निवडणुकीच्या निकालावरून समोर आले आहे. आमदार शिंदे बंधूंच्या पॅनेलचा जनता पराभव केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास शिवसेनेचे माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com