सांगोला (जि. सोलापूर) : सांगोला (Sangola) तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) निवडणुकीमध्ये 'नेत्यांमध्ये एकी झाली; परंतु कार्यकर्त्यांमध्ये बेकी' निर्माण झाल्याचे चित्र आहे. सत्ताधारी शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आदी पक्षांच्या नेत्यांची युती झाली असली तरी याच पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी मात्र आपले उमेदवारी अर्ज माघार घेतले नाही. या निवडणुकीत एकूण १८ जागा जागांपैकी दोन जागा बिनविरोध झाल्या असून १६ जागांसाठी ४४ जणांचे उमेदवारी अर्ज शिल्लक आहेत. (Tradition of unopposed election in Sangola Bazar Committee is broken)
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लक्ष लागून राहिलेल्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडीचे परंपरा खंडित झाली आहे. स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. सत्ताधारी शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेमंडळाचे शेवटपर्यंत बिनविरोधसाठी प्रयत्न केले. डॉ. बाबासाहेब देशमुख, चंद्रकांत देशमुख, शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे दीपक साळुंखे, भाजपचे निवडणुकीसाठी बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला.
या पक्षांमध्ये जागा वाटपाचा तिढा जरी सुटला असला तरी या पक्षातील उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले नाहीत. जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांचेही पॅनेल या निवडणुकीत तसेच ठेवले आहे. त्यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे बाबुराव गायकवाड, आरपीआयचे खंडू सातपुते, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेतेमंडळी एकत्रीत येऊन पॅनल तयार करण्याची शक्यता आहे.
सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ संचालकाची निवड २ हजार १८३ मतदार करणार आहेत. सहकारी संस्था मतदारसंघात ११ जागा असून सर्वसाधारण गटातून ७ जागांसाठी २० अर्ज, महिला गटातून २ जागेसाठी ३ अर्ज, इतर मागासवर्गीय गटातून एका जागेसाठी २ अर्ज, इतर विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून एका जागेसाठी ४ अर्ज, ग्रामपंचायत मतदारसंघात ४ जागा असून सर्वसाधारण गटातून २ जागेसाठी ९ अर्ज, अनुसूचित जाती जमाती गटातून एका जागेसाठी २ अर्ज, व्यापारी मतदारसंघात दोन जागेसाठी ४ अर्ज असे १६ जागेसाठी ४४ उमेदवारी निवडणुक लढवत आहेत.
तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटातून एका जागेसाठी २ अर्ज आणि हमाल व तोलार मतदारसंघात एका जागेसाठी १ अर्ज राहिल्याने दोन जागा बिनविरोध झाल्या असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी प्रमोद दुरगुडे यांनी दिली.
दुपारी तीननंतर माघारीची लगीनघाई
अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटच्या दिवशी तीन वाजल्यानंतर अनेक उमेदवारांनी नामनिर्देश अर्ज माघार घेण्यासाठी कार्यालयात आले होते. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मुदत, वेळ संपल्याने अनेक उमेदवारांना अर्ज माघारी घेता आले नाहीत. यावेळी कार्यालयात मोठा गोंधळही निर्माण झाला होता. अनेकांना आता नको असतानाही लढावे लागणार आहे.
आबासाहेबांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार : सचिन देशमुख
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत स्व. भाई माजी गणपतराव देशमुख परिवर्तन महाविकास आघाडी स्थापन करून विचारांची लढाई लढणार आहे. या आघाडीत सर्व पक्षातील उमेदवारांना सामावून घेतले जाणार आहे. प्रचारात शेकापचा झेंडा घेवून आबासाहेबांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन देशमुख यांनी स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.