Panhala Local Body Elections: राहुल पाटलांमुळे समीकरणे बदलणार; कोरे, नरके यांची प्रतिष्ठा पणाला

Kolhapur Local Body Elections 2025 Vinay Kore vs Chandradip Narke: जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार डॉ. विनय कोरे, माजी आमदार सत्यजित पाटील व करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या पक्षाचे जे उमेदवार रिंगणात असतील, त्यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे.
Kolhapur Local Body Elections 2025 Vinay Kore vs Chandradip Narke
Kolhapur Local Body Elections 2025 Vinay Kore vs Chandradip NarkeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघ हा ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाल्याने या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बिघडली आहेत. वर्षभरापासून निवडणुकीच्या तयारीत असणाऱ्या इच्छुक पुरुष नेत्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. मात्र, सत्ता मिळवण्यासाठी सौभाग्यवतींना किंवा वारसांना मैदानात उतरवण्याची तयारी करू लागले आहेत. त्यासाठी लागणारा ओबीसी दाखला काढण्यासाठी त्यांची धावाधाव चालू झाली आहे. या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

जिल्हा परिषदेला या मतदारसंघात कोणत्या गटांकडून कोणाला उमेदवारी मिळणार, यावरच या मतदारसंघातील लढतीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) व शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

कोतोली मतदारसंघातील निवडणूक यावेळी प्रतिष्ठेची होणार असून, जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार डॉ. विनय कोरे, माजी आमदार सत्यजित पाटील व करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या पक्षाचे जे उमेदवार रिंगणात असतील, त्यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे. कोतोली, कोलोली, तेलवे, नणंद्रे, घोटवडे, निवडे, बोरगाव, पोहाळे, बाजारभोगाव, पोर्ले आणि पाटपन्हाळा ही या मतदारसंघातील प्रमुख गावे असून, त्या गावातील मतदानाचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम होणार आहे.

2017 च्या निवडणुकीत कोतोली गट सर्वसाधारण पुरुषासाठी आरक्षित होता. त्यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे शंकर पाटील हे १८१ मतांनी विजयी झाले होते. शिवसेना गटाचे अजित नरके यांचा निसटता पराभव झाला होता. या मतदारसंघात पंचायत समितीचे कोतोली आणि बाजारभोगाव असे दोन गण आहेत. कोतोली गणात जनसुराज्यच्या रश्मी कांबळे ११०२ मतांनी विजयी झाल्या होत्या. मात्र, बाजारभोगाव गणात शिवसेनेच्या प्रकाश पाटील यांनी जनसुराज्यच्या नितीन पाटील यांच्यावर अवघ्या १ मताने विजय मिळवला होता. कोतोली जिल्हा परिषद गट शाहूवाडी-पन्हाळा आणि करवीर विधानसभा मतदारसंघात विभागला आहे.

Kolhapur Local Body Elections 2025 Vinay Kore vs Chandradip Narke
Pune Koregaon Land Scam: वडील पुण्याचे पालकमंत्री! मुलगा ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला ज्ञात नाही...

या गटातील कोतोली गणामधील अनेक गावांतील स्थानिक स्वराज्य संस्थेत जनसुराज्यची सत्ता असल्याने आमदार डॉ. विनय कोरे यांची निर्णायक ताकद आहे, तर बाजारभोगाव गणामधील अनेक गावे करवीर विधानसभा मतदारसंघात येत असल्याने या मतदारसंघाचे शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे आमदार नरके यांची निर्णायक ताकद आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे माजी आमदार कै. पी. एन. पाटील आणि सतेज पाटील यांना मानणारा गट या मतदारसंघात आहे. कै. पी. एन. यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट) प्रवेश केल्याने या मतदारसंघातील समीकरणे बदलणार आहेत.

जनसुराज्य आणि दोन्ही शिवसेना हे उमदेवार रिंगणात उतरवणार हे नक्की असून, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप हे पक्ष वेगळा उमेदवार देणार की, अंतर्गत मदत करणार, यावर या मतदारसंघातील उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे. सध्याची ही परिस्थिती पाहता दोन प्रमुख पक्षांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. शाहूवाडी-पन्हाळ्याचे आमदार डॉ. विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष हा भाजपचा मित्र पक्ष असल्याने या मतदारसंघात भाजपला मानणाऱ्या गटाची व भाजपमधील इतर मित्र पक्षांची मदत जर जनसुराज्यला झाली, तर गटात जनसुराज्यच्या उमेदवारांसाठी निवडणूक सोपी होणार आहे.

जनसुराज्याचे इच्छुक

संचिता शंकर पाटील, सुनीता विकास पाटील (कोलोली), शिवसेना (शिंदे गट)- संगीता सुभाष पाटील, वर्षाराणी अरुण पाटील (कोतोली). राष्ट्रवादी (अजित पवार गट) मंगल दामोदर गुरव (पोहाळे), अँड. सिद्धी शाहू काटकर (पोर्ले), भाजपकडून पूजा कुंदन पाटील (बाजारभोगाव).

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com