Pankaja Munde - Udayanraje News : पंकजा मुंडेंचे भाषण अन् खासदार उदयनराजेंना अश्रू अनावर

Satara Political News : 'जातीपातीच्या भिंती बांधून त्यावर स्वतःची सोय करणाऱ्यांनी बघावे...'
Pankaja Munde - Udayanraje News
Pankaja Munde - Udayanraje News Sarkarnama
Published on
Updated on

Satara BJP News : माजी मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे या महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असतात. त्यांची रोखठोक भाषणशैली आणि शिवपरिक्रमा यात्रेमुळे त्यांच्या त्यांनी राज्याच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण साताऱ्यातील एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांचं भाषण सुरू असतानाच भाजप खासदार उदयनराजे यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. पंकजा यांनी आपल्या भाषणाता दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि उदयनराजेंना प्रचंड भावूक झाले.

खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या सौभाग्यवती दमयंतीराजे भोसले यांच्या नक्षत्र महोत्सवात पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी त्यांनी उदयनराजेंवर कौतुकाचा वर्षाव केला. त्या म्हणाल्या, एका छत्रपतीचे राजासारखे मन आणि आमच्यासारख्यांना त्यांनी इतके प्रेम दिले. माझ्यासारख्या मुलीला बहीण मानलं हे काय कमी आहे का? असा प्रेमळ सवाल उपस्थित केला. याचवेळी त्यांनी पंकजा मुंडे आणि उदयनराजे बहीण-भाऊ असावेत हेच छत्रपतींना अपेक्षित आहे आणि राजेंनाही हेच अपेक्षित आहे, असेही स्पष्ट केले.

Pankaja Munde - Udayanraje News
Phone Tapping Case : महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘फोन टॅपिंग’? ; माजी गृहमंत्र्यांचा खळबळजनक दावा...

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, माझ्या शिवशक्ती परिक्रमेला पहिल्याच दिवशी उदयनराजे यांच्या उपस्थितीमुळे एक उंची मिळाली. मुंडे साहेबांच्या स्मारकाच्या कार्यक्रमास ही राजे उपस्थित राहिले. मंचावर भाषणाला राजे उभे राहिले आणि दोन मिनिटे ते स्तब्ध शांत उभे राहिले आणि गहिवरले. समोर एक लाख लोक सभागृहात उपस्थित होते.

यावेळी राजेंना स्तब्ध उभे राहिलेले पाहून सर्व लोक गहिवरले होते. काय हे प्रेम आहे. आता जातीपातीच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांनी आणि जातीपातीच्या भिंती बांधून त्यावर स्वतःची सोय करणाऱ्यांनी बघावे असा टोलाही पंकजा मुंडेंनी या कार्यक्रमात लगावला.

'...याची मला उत्सुकता आहे!'

मराठा समाजाला न्याय देणार असे राज्य सरकार म्हणते. मात्र, मराठा समाजाला राज्य सरकार न्याय कसा देणार, याची मला उत्सुकता आहे. मी याकडे उत्सुकतेने पाहते. एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी, असेही मुंडे म्हणाल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंकजा मुंडे म्हणाल्या, वाशीमध्ये नक्की काय सुरू आहे, याची मला सध्या कल्पना नाही. मात्र जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मराठा आरक्षणासंबंधी त्यांची मागणी आहे. मराठा समाजाला घटनात्मकदृष्ट्या टिकेल असे आरक्षण मिळणे आवश्यकच आहे.

अन्यथा समाजाची घोर फसवणूक होऊ शकते. मराठा समाजाच्या मागणीला सरकार प्रतिसाद देते. समाजाला आरक्षण देणार असे सरकार म्हणते. पण हे आरक्षण नेमके कसे देणार, याची उत्सुकता आहे. एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी सरकारला घ्यावी लागणार आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

(Edited By Deepak Kulkarni)

Pankaja Munde - Udayanraje News
Pankaja Munde : मराठ्यांना पाठिंबा अन् ओबीसींनाही दुखावलं नाही; पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com