Phone Tapping Case
Phone Tapping CaseSarkarnama

Phone Tapping Case : महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘फोन टॅपिंग’? ; माजी गृहमंत्र्यांचा खळबळजनक दावा...

Maharashtra Political Breaking : गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांना ‘अलर्ट’न केल्याने...
Published on

Nagpur NCP : एखाद्या भाजप कार्यकर्त्याप्रमाणे काम करणाऱ्या रश्मी शुक्ला यांना राज्याचे पोलिस महासंचालक हे सर्वोच्च पद देत सत्तारुढ महायुती सरकारने पुन्हा एकदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘फोन टॅपिंग’चे संकेत दिल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध असलेल्या तीन गुन्ह्यांचे काय झाले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. देशमुख यांनी अगदी भाजप कार्यकर्त्याप्रमाणे रश्मी शुक्ला यांना बढती दिल्याचा आरोप केला. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडाफोडीचे राजकारण सामान्य जनतेला आवडले नसल्याचा दावा त्यांनी केला.

Phone Tapping Case
Nagpur Firing : हायकोर्टाचा आरटीओ निरीक्षक गीता शेजवळ यांना ‘अंतरिम’ दिलासा

देशमुख यांनी हा दावा करताना 2024 मधील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होईल आणि जनता या सर्व राजकीय घडामोडींना ‘करारा जवाब देईल’, असा विश्वास व्यक्त केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रालय होते. शिवसेना फुटीची सर्व माहिती ‘इंटिलिजन्स’ला असावी. त्यांनी ती गृहमंत्री या नात्याने राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली नाही.

वळसे पाटील यांनी ही माहिती दिली असती तर शिवसेनेत फूट पडली नसती. त्यानंतरचे सत्तांतर झाले नसते. परंतु दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांना ‘अलर्ट’न केल्याने शिवसेनेत मोठी फूट पडल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला. राज्यातील भाजपला ते स्वबळावर जिंकण्याची भिती असल्याने त्यांनी पहिले शिवसेना फोडली. या फोडाफोडीत ‘50 खोके एकदम ओके’ हे राज्यभर गाजले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सहानुभूतीची ही लाट पाहता भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला फोडल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. असा दावा एका ‘पॉडकास्ट’ मुलाखतीत केला. भाजपच्या नागपूरच्या एका बड्या नेत्यांने सांगितलेल्या चार मुद्द्यांचे ‘अॅफिडिव्हिट’ केले नाही. ‘अॅफिडिव्हिट’ केले असते तर राज्यातील तत्कालीन उध्दव ठाकरे यांचे सरकार पडले असते. त्याच बरोबर बड्या नेत्यांच्या अडचणीत वाढल्या असत्या, असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला आहे.

‘अॅफिडिव्हेट’ केले नाही म्हणूनच आपल्यावर ईडी आणि सीबीआयने 130 छापे घातले व 250 लोकांची चौकशी केल्याचा देशमुख यांचा आरोप आहे. 100 कोटींचा आरोप केला असताना ‘चार्जशिट’मध्ये 1 कोटी 70 लाखांचा उल्लेखाचे आश्चर्य वाटते. खोट्या आरोपात 14 महिने आर्थर रोड तुरुंगात रहावे लागले असा दावा अनिल देशमुख यांनी केला. राज्याच्या माजी गृहमंत्र्याला आर्थर रोडच्या जेलमध्ये दहशतवादी अजमल कसाबला ज्या ठिकाणी ठेवले होते त्या 12 क्रमांकाच्या बॅरेकमध्ये ठेवल्याची खंत अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.

Edited By : Prasannaa Jakate

Phone Tapping Case
Nagpur Firing : वसुलीच्या कारणावरूनच संकेत गायकवाड यांच्यावर झाडली गोळी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com