Maan News : पानपट्टीवाल्याचा पोरगा झाला फौजदार; दहिवडीच्या अजिंक्य पवारचे यश

Dahiwadi College दहिवडी कॉलेज दहिवडीचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे दुष्काळी भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत आहे.
Ajinkya Pawar, Dahiwadi
Ajinkya Pawar, Dahiwadisarkarnama

-रूपेश कदम

Maan News : ध्येयाने पछाडले तर काहीही अशक्य नाही. हेच दहिवडी येथील पानपट्टीवाल्याच्या पोराने फौजदार पदाला गवसणी घालून दाखवून दिले. अजिंक्य पवार याने हे यश मिळवले असून या परीक्षेत २५८ वा क्रमांक मिळवून त्याने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.

अजिंक्य अनिल पवार हा येथील सर्वसामान्य कुटुंबातील पोरगा. वडील पानपट्टी चालवतात तर आई गृहिणी आहे. दहिवडी कॉलेजमध्ये इंग्रजी या विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर अजिंक्य याने पोलिस police भरतीसाठी प्रयत्न सुरु केले. मात्र विक्रीकर निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी प्रोत्साहित केल्याने त्याने स्पर्धा परिक्षांकडे MPSC Exam आपला मोर्चा वळवला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक पदासाठी २०२० साली त्याने अर्ज केला. सप्टेंबर २०२१ मध्ये पुर्व परिक्षेत तर ऑक्टोबर २०२२ मध्ये मुख्य परिक्षेत यश संपादन केले. कोरोनामुळे शारिरीक चाचणी व मुलाखतीसाठी वाट पाहवी लागली. मार्च २०२३ मध्ये शारीरीक चाचणी व मुलाखत पार पडली.

Ajinkya Pawar, Dahiwadi
MPSC News: एमपीएससी'च्या कारभाराचा उमेदवारांना फटका; कौशल्य चाचणीची परीक्षा पुन्हा द्यावी लागणार...

या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. ६५० जागांपैकी आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग सोडून ५८३ जागांचा निकाल जाहीर करण्यात आला. यात २५८ वा क्रमांक मिळवून अजिंक्यने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे अजिंक्यने महाविद्यालयीन शिक्षण तसेच पोलिस उपनिरीक्षक पदाचा अभ्यास दहिवडी काॅलेज मध्येच केला आहे.

दहिवडी कॉलेजच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात अभ्यास करुन त्याने हे यश प्राप्त केले आहे. या यशाबद्दल अजिंक्यचे रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्रभाकर देशमुख, प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. अनिल दडस, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ. व्ही. पी. गायकवाड, प्रा. बजरंग मोरे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.

Ajinkya Pawar, Dahiwadi
PSI Pallavi Jadhav : 'पीएसआय' पल्लवी जाधव यांचा नवीन 'लुक' होतोय व्हायरल !

"दोन तास व्यायाम वडीलांना पानपट्टीवर मदत करत मी आठ तास अभ्यासासाठी वेळ दिला. माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद, चंद्रकांत पवार सर यांचे मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा केंद्राचे सहकार्य यामुळे मी हे यश मिळवू शकलो, असेही अजिंक्य पवार याने सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com