Paricharak-Bhalke : ‘दामाजी’वर एकाच हारात सत्कार स्वीकारणारे परिचारक-भालके विधानसभेला दोन हात करणार?

Damaji Sugar Factory : पंढरपूर मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छूक असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक आणि भगीरथ भालके यांचा एकाच हारात आयोजकांनी सत्कार केला. मात्र, विधानसभेला कोणता हार या दोघांना एकत्र आणेल, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Bhagirath Bhalke-Prashant Paricharak
Bhagirath Bhalke-Prashant ParicharakSarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha, 21 September : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या कृतज्ञता मेळाव्यात अपेक्षेप्रमाणे राजकीय जुगलबंदी रंगलीच नाही. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी ‘मी जर सरकारवर निशाणा साधला तर व्यासपीठावरील मान्यवरांना अडचण होईल,’ अशी कोपरखळी मारली खरी पण प्रशांत परिचारकांनी ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे यांच्याकडे हाताने इशारा करत ती काळुंगे सरांकडे टोलावली.

दरम्यान, पंढरपूर मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छूक असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) आणि भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा एकाच हारात आयोजकांनी सत्कार केला. मात्र, विधानसभेला कोणता हार या दोघांना एकत्र आणेल, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

एनसीडीसीकडून मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याला (Dhamaji Sugar Factory ) 94 कोटींचे अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने प्रशांत परिचारकांचा ‘भावी आमदार’ असा उल्लेख केला. त्या कृतज्ञता मेळाव्यात बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे कौतुक केले.

Bhagirath Bhalke-Prashant Paricharak
Rajendra Raut Agitation : चंद्रकांत पाटलांसोबतच्या चर्चेनंतर आमदार राजेंद्र राऊतांनी स्थगित केले मराठा आरक्षणाचे आंदोलन

समविचारी आघाडीच्या संदर्भात या कार्यक्रमात काही राजकीय घडामोडी घडतात, याकडे पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले होते. त्यामुळे कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. मात्र, भगीरथ भालके यांचे एक विधान सोडता एकाही वक्त्याने राजकीय भाष्य केले नाही. कार्यक्रमात भगीरथ भालके आणि प्रशांत परिचारक एकमेकांच्या शेजारी बसले होते. दोघांनाही एकच हार घालनू काखान्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

भगीरथ भालके यांच्या भाषणात पावसाने हजेरी लावल्यामुळे पावसाची हजेरी आगामी काळासाठी शुभ संकेत आहेत , असे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सरकारला उत्तर देताना एका मेसेजवर 94 कोटी उपलब्ध झाले आहेत, त्यामुळे सरकारबद्दलही आगामी काळात कृतज्ञता व्यक्त करावी, असे सांगितले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हे दोघे एकत्र येणार की स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार, याचा सस्पेन्स कायम आहे.

Bhagirath Bhalke-Prashant Paricharak
VBA-Gondwana Party Aghadi : आंबेडकरांची विधानसभेसाठी मोठी खेळी; आदिवासींच्या मतांसाठी गोंडवाना पार्टीशी हातमिळवणी!

परिचारक, भालकेंचे प्रचार दौरे

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार प्रशांत परिचारक हे जिल्हा परिषद गटनिहाय दौरे करत आहेत. त्या दौऱ्यात ते पोटनिवडणुकीत केलेल्या मदतीबाबत पश्चाताप व्यक्त करत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगत आहेत. भगीरथ भालकेही जन आशीर्वाद यात्रेदरम्यान पोटनिवडणुकीत मदत केल्याचा ज्यांना पश्चाताप झाला, त्यांची ती चूक आगामी काळात दुरुस्त करतील, असा विश्वास व्यक्त करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com