Crime News : पारनेर नगरपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसची ( NCP ) सत्ता आहे. विजय सदाशिव औटी यांच्याकडे नगराध्यक्ष पदाचा भार आहे. नगरपंचायतमधील एका अधिकाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता त्यांच्यावर संगणमताने जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा गुन्हा पारनेर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. आरोपींत नगराध्यक्ष औटींसह सात जणांचा समावेश आहे.
चंद्रकांत शेलार ( रा. अंबरनाथ ईस्ट ) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संगणमताने फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. फिर्यादीत म्हंटले आहे की, पारनेरमधील 60 गुंठे जमीन चेतन दुर्गादास मेहरा, धर्मेंद्र गुलाचंद सिराज व निलकमल वजीरलाल सिराज यांच्या नावे असताना नगराध्यक्ष औटी, त्यांचे बंधू नंदकुमार औटी, सुरजकुमार भागाजी नवले, योगेश नारायण झंजाड व इतर तीन जणांनी संगणमताने 23 मे 2014ला तोतया व्यक्तींना मालक म्हणून पारनेरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात उभे केले. त्यांचे बनावट आधारकार्ड, बनावट, बनावट दस्तऐवज, बनावट सही करून जमीन विकली, असे फिर्यादीत म्हंटले आहे.
या प्रकारामुळे पारनेरमधील जमीन खरेदी-विक्री व शासकीय दस्तनोंदणीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. नगराध्यक्षासारखे मोठे पद असलेली व्यक्ती स्वतःच्या भावासह असा जमिनीचा फसवा व्यवहार करीत असेल का? हे प्रकरण आठ वर्षांपूर्वीचे आहे. हा प्रकार का उघडकीस आला नाही. औटी हे नगराध्यक्ष होऊन वर्षही झालेले नाही. हे प्रकरणा आता न्यायालयात गेल्यामुळे न्यायालय यावर काय निर्णय देणार यावर पारनेरमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.