शिवसेनेने पारनेर तालुका प्रमुख बदलला : विकास रोहोकलेंची हकालपट्टी

राज्यातील शिवसेनेत ( Shivsena ) दोन गट पडल्यावर पारनेर तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरवातीला सबुरीची भूमिका घेतली होती.
shivsena
shivsenaSarkarnama
Published on
Updated on

Shivsena : राज्यातील शिवसेनेत ( Shivsena ) दोन गट पडल्यावर पारनेर तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरवातीला सबुरीची भूमिका घेतली होती. मात्र आता शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास रोहोकले यांची शिंदे गटाशी जवळीक वाढत असल्याचे कळताच शिवसेनेने रोहोकले यांची तालुका प्रमुख पदावरून हकालपट्टी केली आहे.

अखेर पारनेर तालुका शिवसेना प्रमख विकास रोहोकले यांची शिवसेना तालुका प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी माजी पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे यांची शिवसेना तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रोहोकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवारी (ता. 20 ) भिमाशंकर येथे व काल (ता. 22) मुंबई येथे भेट घेतली होती. त्या नंतर ते शिंदे गटात जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्या अगोदरही अंतर्गत कलहातून रोहोकले पक्षापासून दूर गेले होते. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

shivsena
रामदास कदम शिवसेना सोडताना रडले... आता शिंदे त्यांना विधान परिषदेत पाठविणार!

पारनेर तालुक्यात शिवसेना पक्षात फुट होणार नाही व सर्व शिवसेना कार्यकर्ते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहाणार ही माजी विधानसभा उपाध्यक्ष व आमदार विजय औटी यांची घोषणा आता हवेत विरली आहे. तालुक्यातील शिवसेनेत अखेर दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. रोहोकले यांना पदवरून दूर केल्याने आता ते शिंदे गटात सामिल होणार हे निश्चित मानले जात आहे.

रोहोकले यांनी शिंदे यांची भेट घेतल्यानंतर औटी तसेच शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले यांनी पारनेर तालुक्यातील शिवसेनेतील हे अंतर्गत बंड शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्यांना य़श आले नाही.

shivsena
शिंदे गटाने नगर जिल्ह्यातील शिलेदारांची नावे केली जाहीर : राजकीय गोंधळाची शक्यता

रोहोकले यांच्या सोबत शिवसेनेतील कोणकोण मुख्यमंत्री शिंदे गटात सामिल होणार या बाबत तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे. पारनेर नगरपंचायतीतील शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक युवराज पठारे, तसेच एका माजी सभापतीसह एक युवा सेनेचा पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपसभापती, जिल्हा परिषदेच्या एक माजी सभापती असे अनेक जण मुख्यमंत्री शिंदे यांच्या गोटात सामील होणार असल्याने हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

आता माजी आमदार औटी यांना शिवसेनेतील हे बंड कितपत थांबविता येणार आहे याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. या नाराज मंडळींची सध्या मनधरणी सुरू आहे मात्र त्यांना यश येईल का व शिवसेनेतील फूट थांबेल का अशीही चर्चा सुरू आहे. पक्षातील अंतर्गत नाराजीमागे कोण आहे याची पण चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.

shivsena
पारनेर तालुक्यात शिंदे गट झाला सक्रिय : शिवसेनेसह राष्ट्रवादीलाही धक्का?

पुनरावृत्ती ठरेल का?

या पूर्वी माजी आमदार औटी यांच्या वाढदिवसानिमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पारनेर येथे आले असता तत्कालिन शिवसेनेचे तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी शक्तिप्रदर्शन केल्याच्या रागातून व पक्षशिस्त मोडल्याच्या कारणावरूऩ त्यांना पदावरून दूर केले होते. त्यानंतर ते थेट राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दाखल झाले व पुढे आमदारही झाले असा इतिहास आहे.

जनतेचे व शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत जावून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी काम करणार आहे. पक्ष संघटना वाढविण्यासाठी वाडीवस्तीवर व प्रत्येक गावात शिवसेनेच्या शाखा स्थापन करणार आहे. पक्षाने दिलेली शिवसेना तालुका प्रमुख पदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळणार आहे.

- डॉ. श्रीकांत पठारे, नवनिर्वाचित शिवसेना तालुका प्रमुख.

मी बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहे. आम्ही शिवसैनिकच आहोत व या पुढेही राहाणार आहोत. आम्ही मुंबईत काल (ता. 22) आदर्शगाव योजणेत समाविष्ट असलेल्या गावांना विकास निधी मिळावा या साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आम्ही तालुक्यातील पक्ष संघटने बाबतही चर्चा केली आहे. तसेच त्यांना भाळवणी येथे येण्याचे निमंत्रणही दिले असून त्यांनी ते स्वीकारले आहे.

- विकास रोहोकले, माजी शिवसेना तालुका प्रमुख पारनेर.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com