Arunadevi Pisal : खंडाळा तालुक्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी (कै.) मदनराव पिसाळ यांनी धोम- बलकवडी धरणाची उभारणी केली. त्यांच्या दूरदृष्टीने खंडाळ्याच्या दुष्काळी तालुक्याचा कलंक पुसला असून, नीरा- देवधर आणि धोम- बलकवडीच्या पाण्यापासून वंचित भागाला पाणी देण्यासाठी मला संधी द्या. (कै.) आप्पांची सून आहे, खंडाळ्याच्या शेतीला पाणी आणि तरुणांच्या हाताला काम मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही अरुणादेवी पिसाळ यांनी दिली.
वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार अरुणादेवी शशिकांत पिसाळ यांनी प्रचारादरम्यान थेट गावोगावी जाऊन गाठीभेटींचा धडाका लावला आहे.
पूर्वीच्या वाई- खंडाळा मतदारसंघातील (कै.) आप्पांचे कार्यकर्ते स्वतःहून अरुणादेवी पिसाळ यांच्या विजयासाठी झटताना दिसत आहेत. आप्पांनीच आम्हाला दुष्काळमुक्त खंडाळ्याचे स्वप्न दाखवले आणि ते प्रत्यक्षात उतरवले आहे.
आज तालुका सुजलाम् सुफलाम् होत असताना आप्पांच्या दूरदृष्टीची जाण आम्हा खंडाळाकरांना निश्चित आहे, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. या वेळी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने खंडाळा प्रभारी शरद ओव्हाळ, तसेच ‘उपरा’कार लक्ष्मण माने प्रणीत भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला.
या वेळी अरुणादेवी म्हणाल्या, ‘‘वाई- खंडाळा- महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात पहिली महिला आमदार होण्यासाठी आबालवृद्ध माता भगिनींनी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे माझा विजय मोठ्या मताधिक्याने होईल.
या विजयात मतदारसंघातील हजारो माता भगिनींचा सहभाग खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे.’’ औद्योगिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या खंडाळा तालुक्यातील महिला व तरुणींच्या हाताला काम देण्यासाठी शंभर टक्के यशस्वी प्रयत्न होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या वेळी डॉ. नितीन सावंत, रामदास कांबळे, सागर कदम, काकासाहेब देशमुख, अजित भरगुडे पाटील, अक्षय गायकवाड, सुशांत जाधव, ॲड. खान, बंजारा समाजाचे जिल्हाध्यक्ष नितीन पवार यांच्यासह पळशी, वडगाव, जवळे, लोहम, झगलवाडी, घाडगेवाडी, लिंबाचीवाडी, कर्णवडी, अतिट, मिरजे, मिरजेवाडी, कानवडी भाटघर, हारतळी वडवाडी, विंग, गुठाळे, शिंदेवाडी, देवघर, गावडेवाडी, शिरवळ या गावांमधील महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते.
अफवांना बळी पडू नका
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे म्हणाले, ‘‘पुड्या सोडण्यात विद्यमान आमदार माहीर आहेत. वाईमध्ये ते वेगळं बोलतात अन् खंडाळा, महाबळेश्वरमध्ये वेगळे. आता तर त्यांनी मतदारांची दिशाभूल करण्यासाठी कॉल सेंटर सुरू केले आहे. बावधन फुटलं, परखंदी फुटली, हे गाव फुटलं ते गाव फुटलं, असा खोटा प्रचार करणारी फसवी यंत्रणाच त्यांनी उभी केली आहे. या अफवांना कुणीही बळी पडू नका. लोकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. वाई मतदारसंघात परिवर्तन अटळ असून, सर्वांगीण विकासासाठी अरुणावहिनींना मोठे मताधिक्य द्या.’’
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.