Udayanraje Bhosale News : तर महाराष्ट्रात फिरायलाही पासपोर्ट लागेल..!

Direct warning of MP Udayanraje Bhosale on independent Vidarbha demand : स्वतंत्र विदर्भ मागणीवरुन खासदार उदयनराजे भोसले यांचा थेट इशारा ; सातारा लोकसभेबाबत बोलणे टाळले...
Udayanraje Bhosale
Udayanraje BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Udayanraje Bhosale News : आपण सर्वजण एकत्र राहिलो नाही तर देशाचे तुकडे होती. आता विदर्भवाले स्वतंत्र राज्याची मागणी करत आहेत. उद्या खानदेशवाले मागणी करतील. त्यानंतर कोकणवालेही म्हणतील स्वतंत्र कोकण द्या, असे झाले तर महाराष्ट्राचे तुकडे होतील आणि आपल्याला आपल्याच राज्यात जायला पासपोर्ट मागायला लागतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, राम मंदीर उद्‌घाटन, सातारा लोकसभा आदी विषयांवर भाष्य केले. ओबीसी आणि मराठा समाजात दुफळी निर्माण होत आहे, या प्रश्नावर उदयनराजे बोलत होते. ते म्हणाले, मी जात-पात मानत नाही.

Udayanraje Bhosale
Beed Crime : बीड जिल्हा हादरला! घरात बोलावून डाॅक्टरकडून बेकायदा गर्भलिंग निदान

कोण ओबीसी कोण मराठा हे म्हणायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. प्रत्येकजण आपापल्या कर्तृत्वावर मोठा झालेला असतो. छत्रपती शिवाजी महाराज काय होते, हे सर्वांना माहिती आहे. आपण सर्वजण एकत्र राहिलो नाही तर देशाचे तुकडे होती. आता विदर्भवाले स्वतंत्र राज्याची मागणी करत आहेत. उद्या खानदेशवाले मागणी करतील, त्यानंतर कोकणवालेही म्हणतील स्वतंत्र कोकण द्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

असे झाले तर महाराष्ट्राचे तुकडे होतील आणि आपल्याला या ठिकाणी जायला पासपोर्ट मागायला लागतील, असा इशारा खासदार उदयननराजे भोसले यांनी दिला.

सातारा लोकसभेबाबत बोलणे टाळले

सध्या सातारा लोकसभेवरुन महायुतीतील घटक पक्षात रस्सीखेच सुरु आहे. याबाबत खासदार उदयनराजेंना छेडले असता ते म्हणाले, याबाबत मला माहिती नाही.

तुम्ही इच्छुक आहात का यावर ते म्हणाले,हा आजचा विषय नाही. त्याला फाटा देऊ नका. ज्या त्यावेळी निश्चित सांगितले जाईल, असे म्हणत त्यांनी या प्रश्नावर अधिक बोलणे टाळले.

(Edited by Amol Sutar)

Udayanraje Bhosale
Daund NCP : अजितदादांच्या नावासाठी दौंड प्रांत कार्यालयात राडा; राष्ट्रवादीचे ठिय्या आंदोलन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com