Grampanchayat Election Result : पाटणला शंभूराज देसाई गट जोमात; १३ ग्रामपंचायतीत सत्ता

Patan Taluka पाटणला आठ ग्रामपंचायतीत मंत्री देसाई यांनी, तर दोन ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने आणि मुंद्रुळकोळे खुर्द ग्रामपंचायतीत काँग्रेसने सत्ता अबाधित राखली.
Shivsena Minister Shambhuraj Desai
Shivsena Minister Shambhuraj Desaisarkarnama
Published on
Updated on

-जालिंदर सत्रे

Grampanchayat Election Result : पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या निकालात आठ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले. मल्हारपेठ , मुंद्रुळकोळे, कुसरुंड, बेलवडे खुर्द, गावडेवाडी, जिंती ग्रामपंचायतींमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाने सत्तांतर घडवले, तर रुवले ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी आणि गाढखोपमध्ये महाविकास आघाडीने मंत्री देसाईंच्या गटाच्या पॅनेलचा पराभव केला. आठ ग्रामपंचायतींची मंत्री देसाई यांनी तर दोन ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने आणि मुंद्रुळकोळे खुर्द ग्रामपंचायतीत काँग्रेसने सत्ता अबाधित राखली.

संपूर्ण पाटण Patan तालुक्याचे लक्ष लागलेल्या मल्हारपेठ व मुंद्रुळकोळे या मोठ्या ग्रामपंचायतींच्या लढती अटीतटीच्या होत्या. मल्हारपेठ ग्रामपंचायतीत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच आघाडीची सत्ता होती. मंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai व त्यांच्या समर्थकांनी प्रतिष्ठापणाला लावून सरपंच पदासह बहुमत घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम व राष्ट्रवादीच्या नेत्यांना धुळ चारली.

ढेबेवाडी विभागावर वर्चस्व असलेल्या व मात्तबर नेतेमंडळी असलेल्या मुंद्रुळकोळे ग्रामपंचायतीची राष्ट्रीय काँग्रेसचे नेते हिंदुराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे असलेली सत्ता देसाई गटाने सत्तांतर घडवून ताब्यात घेतली. बेलवडे खुर्दमध्ये मंत्री देसाई गटात बंडखोरी झाली असताना आणि मनसेने वेगळे पॅनेल उभे केले असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे पानिपत केले.

कुसरुंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत मतभेदाला खतपाणी घालण्यात यश मिळाल्याने राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. सरपंचपदी संगीता शिंदे व सदस्य पदासाठी मधुकर शिंदे हे पती पत्नी निवडून आले. गावडेवाडी, जिंती तही अंतर्गत मतभेदाचे रूपांतर सत्तांतरात झाले आणि मंत्री देसाई यांचे पॅनेलचा विजय सोपा झाला.

Shivsena Minister Shambhuraj Desai
Satara Political News : दुष्काळाचा चुकीचा सर्व्हे; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा : शशिकांत शिंदे

ढेबेवाडी विभागातील रुवले ग्रामपंचायतीत मंत्री देसाई यांच्या पॅनेलचा पराभव करून राष्ट्रवादीच्या रामभाऊ साळुंखे यांनी सत्तांतर घडवून आणले. कोयना विभागातील गाढखोप ग्रामपंचायतीवर शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीने मंत्री देसाई यांच्या पॅनेलचा पराभव केला.

मुंद्रुळकोळे खुर्द ग्रामपंचायतीची सत्ता राष्ट्रीय काँग्रेसच्या हिंदूराव पाटील यांनी राखण्यात यश मिळवले. रामिष्टेवाडी ग्रामपंचायतीमध्ये बिगर राजकीय जनसेवा पॅनेलने सत्ता ताब्यात घेतली. नारळवाडी ग्रामपंचायतींची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसने अबाधित राखली. मल्हारपेठ विभागात ही एकमेव ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे.

Shivsena Minister Shambhuraj Desai
Gram Panchayat Election Results : निवडणुकीत संपूर्ण गाव जिंकलं अन् एकच धुरळा उडाला!; बघा जुन्नरमधील पारुंडे गावात काय घडलं...

पाटणनजीकच्या केरमध्ये माजी सरपंच जगदीश पाटणकर यांनी सहा महिन्यांपूर्वी देसाई गटात प्रवेश केला होता. त्यांच्या पॅनेलचा दारुण पराभव राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करून राष्ट्रवादीची सत्ता अबाधित राखली. मल्हारपेठ विभागात ही एकमेव ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. जमदाडवाडी व शितपवाडीत मंत्री देसाई यांचे वर्चस्व कायम राहिले.

निवी ग्रामपंचायतीत दोन जागेसाठी झालेल्या निवडणुकीत दोन्हीही उमेदवार देसाई गटाचे तर कळकेवाडी येथे फक्त सरपंचपदासाठी देसाई गटांतर्गत , किल्ले मोरगिरी येथील सरपंच पदासाठी थेट लढतीत देसाई गटाने बाजी मारली. मंत्री शंभूराज देसाई यांच्या गावात राष्ट्रवादी काँग्रेस आणि देसाई गटांतर्गत दोन पॅनेल असा तिरंगी सामना झाला. Maharashtra Political News

Shivsena Minister Shambhuraj Desai
NCP Politics : एकत्र राहिलेले एकमेकांचे राजीनामा मागायला लागले : कपिल पाटलांचा राष्ट्रवादीला चिमटा

माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर पाटील विरुद्ध माजी सरपंच प्रवीण पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नीलेश मोरे अशा तिरंगी लढतीत प्रवीण पाटील यांच्या पॅनेलला सहा जागांमुळे बहुमत आणि जालिंदर पाटील यांच्या पॅनेलला सरपंचपदाची लॉटरी व काही जागा मिळाल्या. मतमोजणीत विजयी झालेले उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी कक्षाच्या बाहेर आल्यानंतर घोषणाबाजी करत गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.

Edited By : Umesh Bambare

Shivsena Minister Shambhuraj Desai
Satara Political News : खंडाळ्याचा वीजप्रश्न सुटणार; पुरुषोत्तम जाधवांचे फडणवीसांना साकडे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com