Rajan Patil : माझ्यासह माझ्या परिवाराला लोक गुणदोषांसह स्वीकारतात; राजन पाटलांचे टीकाकरांना उत्तर

Mohol Politics : अनगर येथील लोकनेता सहकारी साखर कारखाना मी खासगी केला नाही तर कारखान्याच्या दहा हजार सभासदांनी ठराव करून केलेला आहे. त्यावेळी झालेल्या सभेचे रेकॉर्डिंगही आमच्याकडे उपलब्ध आहे.
Rajan Patil
Rajan PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 04 October : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केलेल्या टीकेला राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजन पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले. कुणीही कितीही प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, तरी माझ्यासह माझ्या परिवाराला गुणदोषांसह लोक स्वीकारतात. दादागिरीचे राजकारण किती दिवस चालते? हुकूमशाही असल्याचा आरोप केला जातो. मात्र, खरी लोकशाही अनगर गावात पाहायला मिळेल. सूत्रे कोणाच्या हाती ठेवायची, हे मतदार ठरवतील. सर्व आरोपांना जनता उत्तर देईल, असेही राजन पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर उमेश पाटील यांनी ‘सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना खासगी केला, अशा व्यक्तीला सहकार परिषदेचे अध्यक्षपद दिले,’ असा आरोप राजन पाटील (Rajan Patil) यांच्यावर केला होता. त्या टीकेला राजन पाटील यांनी सोलापूर पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत संयमी उत्तर दिले.

ते म्हणाले, अनगर (Angar) येथील लोकनेता सहकारी साखर कारखाना मी खासगी केला नाही तर कारखान्याच्या दहा हजार सभासदांनी ठराव करून केलेला आहे. त्यावेळी झालेल्या सभेचे रेकॉर्डिंगही आमच्याकडे उपलब्ध आहे. कारखान्याच्या सभासदांचे सर्व अधिकार अबाधित आहेत, आजही त्यांचे हित जोपसले जाते.

Rajan Patil
Indapur Politic's : पवारांचा 2029 साठी 'मास्टर स्ट्रोक'; हर्षवर्धन पाटलांचाही विधानसभेचा मार्ग मोकळा...!

लोकनेते सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचे सर्व अधिकार अबाधित आहेत.ते इक्विटी मेंबर आहेत, त्यामुळे सभासदांचे हित साधले गेले आहे. आज खासगी आणि सहकारी कारखान्याची मोठी स्पर्धा आहे. लोकनेते कारखाना पब्लिक लिमिटेड केल्यामुळे सभासदांना शैक्षणिक व आरोग्यविषयक सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहोत. सभासदांच्या घरात लग्न असेल तर दहा हजार रुपयांची मदत दिली जाते, असेही राजन पाटील यांनी स्पष्ट केले.

यशवंत माने चांगले उमेदवार

मोहोळ विधानसभा मतदारसंघात आमदार यशवंत माने यांनी सुमारे 3 हजार कोटींची कामे केली आहेत. निवडणूक लढविणे सोपे नाही. पण, चांगला उमेदवार आवश्यक असतो. आमदार यशवंत माने हेच चांगले उमेदवार आहेत. पक्ष चारित्र्यशील उमेदवाराच्या पाठीशी राहील, अशी मला खात्री आहे, असेही माजी आमदार पाटील यांनी सांगितले.

अप्पर तहसीलमध्ये माझा काहीही स्वार्थ नाही

अनगर अप्पर तहसील कार्यालयास मोहोळ तालुक्यातून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. याबाबत राजन पाटील म्हणाले, अनगरला अप्पर तहसील कार्यालय होण्यात माझा काहीही स्वार्थ नाही. तहसील कार्यालय मोहोळ येथेच आहे. ते कुठेही हलवले नाही. भौगोलिकदृष्ट्या लोकांच्या सोयीसाठी अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय करण्यात आले.

Rajan Patil
Pawar Politic's : पवारांचा फडणवीसांना पुन्हा धोबीपछाड; पंढरपुरातील बड्या नेत्याने घेतली रोहित पवारांची भेट!

लोकसभा निवडणुकीत आम्ही महायुतीचा धर्म पाळला होता. विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही पुन्हा मतदारांसमोर जात आहोत, त्या वेळी लोक आम्हाला स्वीकारतील, असेही राजन पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com