Mohite-Patil Vs Gore : धैर्यशील मोहिते पाटलांचे जयकुमार गोरेंना सडेतोड उत्तर : ‘मोहिते पाटलांना सोलापूरच्या जनतेनं उभं केलंय अन्‌...’

Vidhan Parishad Election 2026 : जयकुमार गोरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्याला सोलापूरच्या जनतेने उभे केले असून भवितव्यही जनताच ठरवेल, असे म्हटले.
Jaykumar Gore-Dhairyasheel mohite Patil
Jaykumar Gore-Dhairyasheel mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 08 June : ज्या देवेंद्र फडणवीसांनी संपलेली कुटुंबं उभा केली. त्याच कुटुंबांनी फडणवीसांनी टाकलेल्या शब्दांचा अवमान करणाऱ्या मोहिते पाटील यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला होता. त्याला खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उत्तर दिले आहे. मोहिते पाटलांना सोलापूरच्या जनतेने उभा केलं आहे आणि आम्हाला कुठं नेऊन ठेवायचं, हे जनताच ठरवेल, असा टोला त्यांनी गोरेंना लगावला.

विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने अकलूजचे मोहिते पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यात जोरदार शाब्दीक युद्ध रंगले आहे. एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान दिले जात आहे. मोहिते पाटील कुटुंबाला केलेल्या मदतीबाबत गोरेंनी भाष्य केले होते, त्याला खासदारांनी उत्तर दिले आहे.

धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील जनतेने आम्हाला राजकारणात उभं केलं आहे आणि आम्हाला कुठं नेऊन ठेवायचं, हेही जनताच ठरवेल. शिवाय, देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला काय मदत केली आहे, हे मी जाहीरपणे बोललो आणि त्याबद्दल जाहीर आभारही मानले आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुकीत मी माझ्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करतोय. त्या दरम्यान मी विकास कामांवर बोलतोय. त्यांनी त्यांचं सांगावं, असे आव्हानही मोहिते पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दिले आहे.

मी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. लोकशाहीतील अदृश्य शक्ती आहे, त्या सर्वांना मी भेटलो आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपला आकडा नक्की किती आहे, तो एकदा ठरवावे. एकदा सहाशे म्हणतात, तर कधी पाचशे म्हणतात. गोरे हे पालकमंत्री आहेत की पोस्टमन आहेत, हे त्यांनी ठरवावं, असं उत्तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची पोस्टमन

Jaykumar Gore-Dhairyasheel mohite Patil
Mohite Patil On Rajendra Raut : धैर्यशील मोहिते पाटलांचा राजेंद्र राऊतांवर पलटवार : ‘अकलूजला ही गोष्ट नवीन नाही; त्यांना जे वाटतंय...’

सोलापूर जिल्ह्यात कुठलंही इलेक्शन लागलं की, मोहिते पाटील उमेदवार नसले तरी मोहिते पाटलांवर टीका करणं सोडून त्यांना दुसरं काहीच जमत नाही. निवडणुकीत विकासाच्या मुद्यावर कोणीही बोलत नाही, आम्ही मात्र विकास कामांवर प्रचार करणार आहोत. त्यांचा वैयक्तीक पातळीवर प्रचार सुरू आहे. कोतवाल नमस्कार करत नाहीत, असं सांगून पालकमंत्री जयकुमार गोरेंनी त्यांची संस्कृती दाखवून दिली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

मोहिते पाटील म्हणाले, विरोधी पक्षातील नेत्यांच्या स्टेटमेंटचे व्हेरिफिकेशन करा, त्यात पालकमंत्री जयकुमार गोरे आणि तुम्ही नाव घेतलेल्या व्यक्तीचे (राम सातपुते यांचे नाव न घेता) स्टेटमेंट काय आहे, दोघांच्या बोलण्यात विरोधाभास दिसून येतो.

संपलेल्या व्यक्तीवर मी बोलत नाही

उत्तम जानकरांसोबतचं भांडण कसं मिटलं, हे तुम्हाला का सांगू. काय झाले आहे, ते तुम्हाला थेट दिसेलच. तसेच, संपलेल्या व्यक्तीवर मी चार चार वेळा बोलत नाही, असे सांगून राम सातपुते यांचे नाव न घेता मोहिते पाटील यांनी सडकून टीका केली.

Jaykumar Gore-Dhairyasheel mohite Patil
NCP politics : राष्ट्रवादीतून साईडलाईन झालेल्या तटकरे-पटेल जोडीचा 'मास्टरस्ट्रोक'; दोन निर्णयांनी पक्षातील वरचष्मा सिद्ध!

नारायण पाटलांनी भाजपला पाठिंबा का दिला?

नारायण पाटील यांनी भाजपला पाठिंबा का दिला आहे, हे त्यांनाच विचारलेलं बरं. माझे मतदार माझ्याबरोबर आहेत. मतदारांबरोबर मी काम करतोय. तब्बल सहाशे अदृश्य मतदार माझ्याबरोबर आहेत, असा दावा धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला आहे. आम्ही कोणतेही विषय काढलेले नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com