Karmala News : बागलांना मोठा धक्का; उस्मानाबाद जनता बॅंकेकडून वैयक्तिक मालमत्ता जप्तीची कारवाई

Osmanabad Janata Bank Loan Issue : उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे वरिष्ठ संचालक आणि बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी बागल यांची संपत्ती जप्त करण्यासाठी करमाळा तहसील कार्यालय गाठले. त्या ठिकाणी बागल यांची संपत्ती जप्त करण्यासाठी पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली होती.
Rashmi Bagal-Digvijay Bagal
Rashmi Bagal-Digvijay BagalSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 27 January : सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा शिवसेनेकडून (शिंदे गट) विधानसभेची निवडणूक लढलेले दिग्विजय बागल आणि त्यांच्या भगिनी भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल यांची वैयक्तिक मालमत्ता जप्तीची कारवाई उस्मानाबाद जनता सहकारी बँकेने सुरू केली आहे, त्यामुळे तालुक्यात राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगली आहे. बॅंकेची ही कारवाई बागल गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे (Osmanabad Janata Bank) वरिष्ठ संचालक आणि बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी बागल यांची संपत्ती जप्त करण्यासाठी करमाळा तहसील कार्यालय गाठले. त्या ठिकाणी बागल यांची संपत्ती जप्त करण्यासाठी पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर उस्मानाबाद जनता सहकारी बँकेची लोकं का आले आहेत, याविषयीची चर्चा सुरू झाली.

सुरुवातीला हे काय चाललं आहे, याविषयी कोणीही काहीही बोलायला तयार नव्हते. नंतर मात्र उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या संचालकांनी सांगितलं की, बागल (Bagal) यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेकडून कर्ज घेतले आहे, हे कर्ज वेळेत भरले नसल्यामुळे बँकेच्या नियमाप्रमाणे तारण देण्यात आलेली मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही सुरू आहे.

करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखाना हा स्थापनेपासून बागल यांच्या ताब्यात आहे. या कारखान्यावर आत्तापर्यंत बागल यांच्या कुटुंबातील (स्व.) माजी मंत्री दिगंबरराव बागल, रश्मी बागल आणि दिग्विजय बागल या तिघांनी अध्यक्षपद भूषविले आहे.

Rashmi Bagal-Digvijay Bagal
Tatkare Vs Gogawale : भरत गोगावलेंचा तटकरेंवर गंभीर आरोप; ‘शिवसेनेच्या आमदारांना पाडण्यासाठी सेटलमेंट...’

बागल यांच्याकडे मकाई सहकारी साखर कारखान्याची एकहाती सत्ता असूनही हा कारखाना मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. कारखान्यावर विविध बँकांचे कोट्यवधी रुपयाचे कर्ज आहे, त्यामुळे कारखान्याकडील थकीत देणी देण्यासाठी बागल यांनी वैयक्तिक मालमत्ता तारण ठेवून कर्ज घेतल्याचे सांगितले जात आहे.

बागल यांच्या घराला मोठा राजकीय वारसा लाभलेला आहे. दिग्विजय बागल यांचे वडील (स्व.) दिगंबरराव बागल हे दोन वेळा करमाळ्याचे आमदार आणि एकदा राज्यमंत्री होते. तसेच, त्यांच्या आई श्यामलताई बागल या 2009 मध्ये करमाळ्याच्या आमदार होत्या.

त्यानंतर 2014, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दिग्विजय बागल यांच्या भगिनी रश्मी बागल यांचा पराभव झाला, तर 2024 ची विधानसभा निवडणूक स्वतः दिग्विजय बागल यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून लढवली होती. मात्र, त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. विधानसभेनंतर बागल यांच्यावर ही कारवाई सुरू झाल्याने तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Rashmi Bagal-Digvijay Bagal
Sharad Pawar : उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन; केली ‘ही’ विनंती...

थकीत कर्जाच्या वसुलीप्रकरणी कारवाई

याबाबत उस्मानाबाद जनता सहकारी बॅंकचे सीईओ म्हणाले, बागल यांच्याकडील थकीत (ड्यूज) कर्जाच्या वसुलीप्रकरणी ही कारवाई होती. रिझर्व्ह बॅक, राज्य सहकारी विभागाच्या वेगवेगळ्या कायदेशी प्रक्रिया आहेत, त्या अनुषंगाने ही कारवाई केलेली आहे. त्यापेक्षा जास्त काही सांगता येणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com