
Raigad, 27 January : महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रायगडच्या पालकमंत्रिपदावरून पेटलेला वाद थांबायचे नाव घेत नाही. यात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले हे एकमेकांना भिडल्याने त्याचे गांभीर्य वाढले आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही चुकीचे काम केले आहे, हे तटकरेंनी दाखवून द्यावं, आम्ही मंत्रिपदासह आमदारकीचाही राजीनामा देईल. मात्र, तटकरेंनी विधानसभा निवडणुकीत माझ्यासह महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांना पाडण्यासाठी कोणाकोणाशी सेटलमेंट केली, हे आम्ही दाखवून देतो, असे उघड चॅलेंज मंत्री गोगावलेंनी तटकरेंना दिलं आहे.
भरत गोगावले (Bharath Gogawale) म्हणाले, पालकमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे शिवसेनेची नावं दिली होती. त्यात माझं आणि नाशिकचे दादा भुसे यांना पालकमंत्रिपद मिळालं नाही. पण आमचा वाद सुरू झाला, तो वेगळ्या कारणामुळे आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मी आणि महेंद्र दळवी, तसेच आमच्यासोबत रविशेठ पाटील, योगेश कदम या सगळ्यांनी अगदी मनापासून काम केलं होतं. आम्ही कुठल्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला आणि मतदाराला चुकीचं सांगितलं असेल तर आम्ही दोन बापाचे, असे वक्तव्य काल केले होते. आमचं म्हणणं चुकीचं आहे, हे सुनील तटकरे यांनी दाखवून द्यावं.
विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी जे काही केलं, ते सर्वांना कळणं गरजेचे आहे. पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे म्हणून भरत गोगावले नको. महेंद्र दळवी का नको, तिकडं घारे निवडून यायला पाहिजेत. दळवींना पाडण्यासाठी तिकडं जयंतभाईंशी (शेकापचे माजी आमदार जयंत पाटील) सेटलमेंट केली. महेंद्र थोरवे आणि त्यांच्यातील लढाई चालूच होती. तो भाग आम्ही बाजूला ठेवतो, असेही भरत गोगावले यांनी स्पष्ट केले.
राजकारणात माणसाने किती वाईट कृत्य करावं, याला काही सीमा आहे की नाही. लोकसभेला आम्ही काय चुकीचं केलं आहे, हे दाखवलं तर आम्ही दोन बापाचे होऊ, असे आव्हान दिलं आहे. त्यांनी आमची चूक दाखवली, तर मंत्रिपदासहित आमदारकीचा राजीनामा देईल आणि आम्ही असंच बोलत नाही. करून दाखवतो, असे आव्हानही गोगावले यांनी तटकरेंना दिलं.
आमचे महेंद्र दळवी तर त्यांच्याशिवाय (सुनील तटकरे) पाणीही पित नव्हते. महेंद्र दळवी जे काही बोलत आहेत, ते चुकीचं बोलत नाहीत. आम्हीही त्यांना बडबडतोय, समजावून सांगतोय. पण, आज त्यांचं खरं स्वरूप आम्हाला पाहायला मिळालेलं आहे. म्हणून आमचा राग आहे, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले.
आम्ही खरं काम केलं आहे, म्हणून आम्ही बोलतोय. आम्ही काही चुकीचं केलेलं असेल तर दाखवावं. उलट आम्ही त्यांच्या मतदारसंघातील आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं, आदिती तटकरेंचं काम करायचं. त्यांना निवडून आाणायचं. माणगावचे आमचे राजू साबळे, मानकर वकिल, तसेच श्रीवर्धन, आणि तळेच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही विचारू शकता. आमच्या लोकांनी कामं केलं नसेल तर आम्हाला विचारा. एवढं करूनही ते असं वागणार असतील ते कितपत योग्य आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय करतील
पालकमंत्रिपदाबाबत आम्ही आमच्या नेत्यांना कल्पना दिलेली आहे. त्यांनीही खंबीर भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाओसहून आले आहेत. कदाचित आज किंवा उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसतील आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत योग्य निर्णय घेतील, असं आम्हाला वाटतंय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.