Sharad Pawar : उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन; केली ‘ही’ विनंती...

Supriya Sule gave information about Sharad Pawar's health : शरद पवार यांची तब्येत आता बरी आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनीही फोन करून चौकशी केली आहे.
Sharad Pawar-Uddhav Thackeray
Sharad Pawar-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 27 January : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत आता बरी आहे. पवार यांच्या तब्यतेची विचारपूस करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आला की नाही, याबाबत मला माहिती नाही. पण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा रविवारी (ता. २६ जानेवारी) चौकशीसाठी फोन आला होता. त्यांनी साहेबांना चार दिवस घरीच थांबून आराम करण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

खासदार सुप्रिया सुळे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या तब्यतेबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या की, शरद पवार यांची तब्येत आता बरी आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनीही फोन करून चौकशी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीबाबत सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, आम्ही नारा द्यायला आलो नाही (स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात). आम्ही आज बैठक घेणार आहोत. आमची ही बैठक महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने असेल. पुण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्या बाबत लोकं पॅनिक होतील, म्हणून आम्ही बोलत नव्हतो.

एसटीच्या भाडेवाढीवरही खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, एसटीच्या भाडेवाढीचा निर्णय त्या विभागाच्या सचिवांनी परस्पर घेतला असेल तर ते फार गंभीर आहे. मी स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना फोन करणार आहे.

Sharad Pawar-Uddhav Thackeray
Maharashtra Politic's : लोकसभेनंतर पायाखालची जमीन सरकलेल्या भाजपने विधानसभेत मोठं कारस्थान केलं; काँग्रेस नेत्याने गणितच मांडले

महागाई आणि बेरोजगारी या विषयामध्ये राज्य सरकारने लक्ष घालावं, अशी आमची विनंती आहे. राज्यात पिकविमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मान्य केले आहे, त्यामुळे कृषिमंत्री कोकाटे हे सत्य बोलले आहेत. आता हा मुद्दा मी लोकसभेच्या अधिवेशनात मांडणार आहे. पीकविमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे खुद्द कृषिमंत्री कबूल करत आहेत, ते मी संसदेत सांगणार आहे.

दरम्यान, पीकविमा योजनेतील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत हा पीकविमा योजनेतील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणला होता.

Sharad Pawar-Uddhav Thackeray
Vasant Purke : माजी मंत्री पुरकेंनी टोचले काँग्रेस नेत्यांचे कान; ‘अजूनही काहींना सत्तेत असल्यासारखं वाटतंय’

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील नेते, पुणे महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्याकडून एका ज्येष्ठ नागरिकाला झालेल्या मारहाणीवर सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ॲक्शन घेणार आहे, असं मी चॅनेलवर पाहिलं आहे. त्यांना २४ तास वेळ द्या. उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय निर्णय घेतात, हे मी पाहणार आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com