Phaltan doctor Death case : रामराजे निंबाळकर जुने हिशेब चुकते करणार, 'त्या' 277 केसेस घेऊन थेट हायकोर्टात जाणार

Ranjitsinh Naik Nimbalkar vs Ramraje Nimbalkar : फलटण येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या आत्महत्या प्रकरणावरून भाजपचे नेते तथा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत.
Ranjitsinh Naik Nimbalkar, Ramraje Nimbalkar
Ramraje Nimbalkar addressing the media in Phaltan amid growing tension over the doctor’s death case, demanding a SIT probe and alleging police misconduct.Sarkarnama
Published on
Updated on

Phaltan News, 04 Nov : फलटण येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या आत्महत्या प्रकरणावरून भाजपचे नेते तथा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत.

तर याच आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी रणजितंसिंह नाईक निंबाळकर यांनी काल सोमवारी (ता.03) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी 'माझ्यासकट सर्वांचीच लाय डिटेक्टर टेस्ट करा, असे खुले आव्हान दिलं. तसंच डॉक्टर महिला प्रकरणाशी माझा संबंध नाहीच. मात्र, माझ्यावरच्या इतर सर्व आरोपांचे मास्टरमाईंड हे रामराजे निंबाळकर हेच आहेत,' असा गंभीर आरोप देखील केला.

अशातच आता रणजितंसिंह नाईक निंबाळकर यांच्या या आरोपांना उत्तर देण्यासाठी रामराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेतली असून या पत्रकार परिषदेत त्यांनी फलटणमधील पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. यावेळी त्यांनी फलटणचे माजी डीवायएसपी धस यांचं नाव घेत त्यांच्या काळात दाखल झालेल्या 277 केसेस हाय कोर्टात घेऊन जाणार आणि आणि एसआयटी नेमण्याची मागणी करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

शिवाय या प्रकरणी पोलीस तपासात काय निघतंय हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं नाही. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास आहे, असं मोठं वक्तव्य देखील रामराजेंनी यावेळी केलं. रणजितंसिंह नाईक निंबाळकर यांच्या आरोपांना उत्तर देताना रामराजे म्हणाले, त्यांचं नाव घ्यायची माझी इच्छा नाही.

पण त्यांनी माझं टोपणं नाव मास्टरमाईंड ठेवलं आहे. मास्टरमाईंडने असं का केलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा कॅन्सल व्हावी म्हणून मी हे केलं असा त्यांचा आरोप आहे. पण आमची पार्टी वेगळी आहे आणि मी असलं करत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तर ज्या हॉटेलात मुलीची आत्महत्या झाली त्याचा मास्टरमाईंड मीच होतो का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Ranjitsinh Naik Nimbalkar, Ramraje Nimbalkar
Ramraje : मला तुरुंगात टाकच; मग बघतो फलटणमध्ये तू कसा राहतो ते?; तुरुंगातून तुला थर्ड लावेन : रामराजेंचा कडक इशारा

तसंच यावेळी त्यांनी फलटण जिल्ह्यातील पोलिसांना एका व्यक्तीकडून डायरेक्शन जातात तो व्यक्ती याच जिल्ह्यातील आहे त्याचा मास्टरमाईंडही मी आहे का? या सगळ्यांचा मास्टरमाईंड मी आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आणि जर या सगळ्याचा मास्टरमाईंड मी असेल तर त्यांनी माझ्यावर दोन अडीशे कोटींची डिफेमेशनची केस लावावी, त्यांनी पुरावे द्यावेत असं आव्हानही रामराजेंनी यावेळी रणजितंसिंह निंबाळकरांना दिलं.

शिवाय संबंधित डॉक्टर मुलीने त्यांच्या विभागात दबाव टाकणाऱ्या पोलिसांबाबतची तक्रार माजी डीवायएसपी धस साहेबांकडे केली होती. ती तक्रार दाबली गेली, रात्री बाराला दबाव टाकला जायचं, असा त्या मुलीने आरोप केला आहे. ती मुलगी कोण? कुठे राहते हे देखील मला माहिती नव्हतं.

पण धस साहेबांचं नाव घेण्याचं कारण म्हणजे ते इथे कुणामुळे आले आणि कोणामुळे बदली झाली याचा शोध तुम्हीच घ्या. शिवाय माझी माहिती अशी आहे की रात्री दीडला एका व्यक्तीच्या घरी एफआयआर लिहिले जायचे. त्यामुळे या मुलीच्या आत्महत्या प्रकरणात जशी एसआयटी केली जाणार आहे. तशी धस साहेबांची एसआयटी वेगळी लावली पाहिजे, अशी मागणी रामराजेंनी यावेळी केली.

Ranjitsinh Naik Nimbalkar, Ramraje Nimbalkar
Prashant Padole : 'शेतकऱ्यांना 1 लाख दिले नाही तर यावेळी आम्ही आत्महत्या करणार नाही तुम्हाला उडवून देऊ...'; काँग्रेस खासदाराची थेट मोदी-फडणवीसांना धमकी

शिवाय धस साहेबांच्या मागे लागण्याचं कारण म्हणजे अशी दोन नंबरचा धंदा करणारी एकही व्यक्ती नाही की त्याच्याकडून धस यांनी हफ्ता घेतलेला नाही. शिवाय धस यांच्या काळातील 277 केसेस आहेत. ज्याचा उल्लेख सुषमा अंधारेंनी केला आहे. या केसेसचा कोणाच्या काळात झाल्या तर धस साहेबांच्या काळात त्यामुळे त्यांची एसआयटी चौकशी व्हावी.

फलटण तालुक्याची बदनामी झाली की नाही हे तालुक्यातील जनतेने सांगावं. पोलीस बळाचा वापर करून चार अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यांच्या विरोधात मुकादमांनी तक्रारी का केल्या आणि ज्यांच्या काळात हे सर्व झालं आहे त्यांची एसआयटी झाली पाहिजे. त्यामुळे हे सगळं पुन्हा डीवायएसपींकडे पोहोचतंय आणि 277 केसेस खऱ्या असतील तर वकीलांचा सल्ला घेऊन या 277 केसेस घेऊन मी हायकोर्टात एसआयटीची मागणी करणार आहे, असं रामराजे निंबाळकरांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com