Naik Nimbalkar Politic's : फलटणमध्ये प्रथमच असं घडतंय; नाईक निंबाळकरांचा निवडणुकीच्या राजकारणात प्रथमच ‘ब्रेक’

Zilla Parishad-Panchayat Samiti Election : फलटण तालुक्यातील प्रभावी नाईक निंबाळकर घराण्याने यंदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवार न दिल्याने सातारा जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
ramraje naik nimbalkar-ranjitsinh naik nimbalkar
ramraje naik nimbalkar-ranjitsinh naik nimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Satara, 25 January : फलटण तालुक्याच्या राजकारणात नाईक निंबाळकर घराण्याचे नाव गेली अनेक दशके केंद्रस्थानी राहिले आहे. नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो की पंचायत समिती फलटणमधील नाईक निंबाळकर घराण्यातील सदस्य निवडणूक रिंगणात नाही, असे कधी होत नाही. किमान एक उमेदवार रिंगणात असणे, ही जणू परंपराच होती. मात्र, यावेळच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत फलटण तालुक्यातील एकाही गटात नाईक निंबाळकर घराण्याने थेट उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. ही वादळापूर्वीची शांतता म्हणावी का? असा कयासही काही जण काढत आहेत.

निवडणूक कोणीतीही असो फलटणच्या (Phaltan) नाईक -निंबाळकर घराण्याच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत नाईक निंबाळकर घराण्यातील संघर्ष पाहायला मिळाला आहे. हा संघर्ष यापूर्वीपासूनचा आहे. याआधीच्या निवडणुकांत नाईक निंबाळकर घराण्याच्या अंतर्गत संघर्षानेच निवडणुकीला वेगळे वळण दिले होते.

हिंदुराव नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) या दोन्ही गटांतील मतभेद उघडपणे निवडणूक रणांगणात उतरले होते. एकाच घराण्यातील दोन शक्तिकेंद्रांमधील संघर्षामुळे मतदारांचीही विभागणी झाली होती.

काही रामराजेंच्या गटात, तर काही हिंदूराव नाईक निंबाळकरांच्या गटासोबत राहिले. (कै.) हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या निधनानंतर या सत्ता संघर्षात त्यांचे चिरंजीव रणजितसिंह नाईक निंबाळकर उतरले. त्यामुळे नाईक निंबाळकरांतील सत्ता संघर्ष झाला नाही, अशी निवडणूकच नाही.

ramraje naik nimbalkar-ranjitsinh naik nimbalkar
Gulabrao Patil : तुमची बायको हेमामालिनी आहे असं समजा, गुलाबराव पाटलांचा तीन वर्षांनी गुन्हा तोल गेला..

या सर्व पार्श्वभूमीवर यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मात्र, नाईक निंबाळकर घराणे पूर्णपणे रिंगणाबाहेर राहिले आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर दीर्घकाळ आपली मांड राखणारे, सत्ता-समीकरणे ठरवणारे आणि अनेक निवडणुकांचे निकाल प्रभावित करणारे हे घराणे या वेळी थेट निवडणूक लढवण्यापासून दूर राहिले आहे. मात्र, दोन्ही गटांचे उमेदवार रिंगणात आहेत. यामागे घराण्यातील अंतर्गत राजकीय पुनर्रचना, भविष्यातील नवीन डावपेचांची तयारी की जाणीवपूर्वक घेतलेला ‘ब्रेक’ याची चर्चा सुरू आहे.

ramraje naik nimbalkar-ranjitsinh naik nimbalkar
Bhalke Politic's : पंढरपूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट; भगीरथ भालकेंच्या वहिनींची झेडपी निवडणुकीतून माघार

नाईक निंबाळकर घराण्याच्या अनुपस्थितीचा थेट परिणाम फलटण तालुक्यातील निवडणूक रणांगणावर दिसून येत आहे. अनेक गटांत नव्या नेतृत्वाला संधी मिळाली असून, पारंपरिक राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. एकूणच, जिल्हा परिषदेच्या यावेळच्या निवडणुकीत नाईक निंबाळकर घराण्यातील व्यक्ती रिंगणात नसणे, ही फलटणच्या राजकारणातील महत्त्वाची आणि अनपेक्षित घडामोड मानली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com