Gulabrao Patil : तुमची बायको हेमामालिनी आहे असं समजा, गुलाबराव पाटलांचा तीन वर्षांनी पुन्हा तोल गेला..

Gulabrao Patil On Hema Malini : आज राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमात उपस्थितांना मतदानाचे महत्व सांगताना राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांचा तोल गेला.
Hema Malini, Gulabrao Patil
Hema Malini, Gulabrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे नेहमी झोकात नको ते वक्तव्य करत असतात. त्यांच्या अशा वक्तव्यांनी ते नेहमी चर्चेत येतात. आता अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरुन ते चर्चेत आले आहेत.

अलिकडेच त्यांनी एक वक्तव्य केलं, ते म्हणाले. 'नोकऱ्या आहेत, पण मराठी माणसात काम करण्याची मानसिकता नाही'. बिहारचा माणूस येथे येऊन पोट भरतो आणि आपण त्यांच्यावर टीका करतो. तुम्ही का टीका करता. कोण म्हणतं काम नाही, काम आहे..तरुणांना राग आला तर आला कारण आता ४ वर्षांनी निवडणुका आहे. असं विधान नुकतच गुलाबराव पाटील यांनी केलं होतं त्यावरुन ते वादात सापडले.

मराठी तरुणांच्या विधानावरुन विरोधकांनी गुलाबराव पाटील यांना चांगलेच फैलावर घेतले. मात्र या विधानाची धग विझत नाही तोच गुलाबराव पाटील यांचा परत तोल गेला आहे. आज राष्ट्रीय मतदार दिन आहे. मतदानाचा हक्क काय असतो हे समजावताना त्यांनी केलेल्या विधानाने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, आता राज्याच्या पोटी राजा जन्माला येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाटा बिर्ला यांना एक मत देण्याचा अधिकार दिला आहे. तोच अधिकार आपल्या सर्वांना दिला आहे. हेमा मालिनी यांना देखील एक मत देण्याचा अधिकार दिलाय. त्यामुळे तुमच्या बायकोला सुद्धा मत देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी तुमची बायको हेमा मालिनी आहे असं समजा असं वादग्रस्त वक्तव्य पाटलांनी यावेळी केलं.

Hema Malini, Gulabrao Patil
Chhagan Bhujbal : ईडीचे ग्रहण सुटले, आता भुजबळांच्या मागे लागल्या अंजली दमानिया

गालावरुन घसरला होता तोल

दरम्यान, तीन वर्षांपूर्वी त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांबाबत टिप्पणी करताना हेमा मालिनी यांचे नाव घेत वक्तव्य केलं होतं. आपल्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत. असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. त्यावेळी सर्वसामन्य लोक असं बोलत असतील तर आपण समजू शकतो परंतु खासदार किंवा संविधानिक पदावरील लोक असे बोलत असतील तर ते योग्य नाही. या शब्दात हेमा मालिनी यांनी पाटील यांच्यासह असं बोलणाऱ्यांचा समाचार घेतला होता.

आता तीन वर्षांनी पुन्हा गुलाबराव पाटील यांनी हेमामालिनी यांचे नाव घेत वक्तव्य केलं आहे. राजाच्या पोटी राजा जन्माला येत नाही. राजा आता मतपेटीतून जन्माला येतो हा इतिहास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवल्याचे ते म्हणाले. मात्र हे समजून सांगताना त्यांनी हेमामालिनी यांचे उदाहरण दिले. त्यामुळे राजकीय वर्तुळात या विधानाची चर्चा रंगली आहे.

Hema Malini, Gulabrao Patil
Nashik Politics : नाशिकच्या निफाडमध्ये उपनगराध्यक्षावर जादूटोणा ; काळ्या बाहुल्या, लिंबू व धमकीच्या चिठ्ठ्या..

इम्तियाज जलील यांना सल्ला

दरम्यान इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र हिरवागार करू असं वक्तव्य केलं होतं. त्याला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोणी म्हटल्याने महाराष्ट्र हिरवा गार किंवा पिवळा गार होत नसतो.अशा वक्तव्याला काही अर्थ नाही इम्तियाज जलील यांना माझा सल्ला आहे अशा प्रकारे वक्तव्य त्यांनी करू नये. तसेच महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडू नये असा सल्ला गुलाबराव पाटील यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com