

Kolhapur Political News : जिल्ह्यात सर्वत्र जिल्हा परिषद निवडणुकीचा माहोल तयार झाला असताना सर्वच उमेदवार प्रचाराच्या निमित्ताने रस्त्यावर आहेत. प्रत्येक उमेदवाराचा विजयासाठी खटाटोप सुरू आहे. परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी महायुती एकत्र तर काही ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. तर काही तालुक्यात अभद्र युती निर्माण झाली आहे.
ही अभद्र युतीच आता उमेदवारांसह नेत्यांची डोकेदुखी बनली आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातील दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे फोटो महाविकास आघाडी आणि महायुतीच्या फलकांवर झळकत असल्याने उमेदवारांची मोठी कसरत होत आहे.
काँग्रेस नेते आणि करवीर विधानसभा मतदार संघांचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे मे 2024 मध्ये निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राजकीय वारसदार म्हणून त्यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील विधानसभा निवडणूक लढवली. काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल पाटील यांचा शिवसेनेचे नेते आमदार चंद्रदीप नरके यांनी पराभव केला. मात्र या पराभवानंतर काहीच महिन्यात महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर काँग्रेसकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.
सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर याचा खोलवर परिणाम झालेला दिसून येत आहे. तत्कालीन परिस्थितीत दिवंगत नेते आमदार पी एन पाटील हे काँग्रेसमध्येच सध्या काँग्रेसच्या उमेदवारांनी आमदार पी एन पाटील यांचा फोटो सर्वच फलकावर लावलेला आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या सर्वच पक्षातील उमेदवारांनी महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या उमेदवारांनी राहुल पाटील यांच्यासोबत दिवंगत नेते पीएन पाटील यांचे देखील फोटो लावले आहेत.
करवीर विधानसभा मतदारसंघातील 12 जिल्हा परिषद मतदार संघ आणि 24 पंचायत समितीसाठी तब्बल 81 उमेदवार रिंगणात आहेत. या सर्वच उमेदवारांनी बहुतांश ठिकाणी आपापल्या सोयीप्रमाणे दिवंगत नेते पी एन पाटील यांचे फोटो वापरल्याने मतदारांमध्ये देखील संभ्रमता निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे तर उमेदवारांसह नेत्यांची डोकेदुखी देखील वाढली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात या प्रकारामुळे बहुतांश उमेदवारांना त्याचा फटका बसणार आहे. हाच फोटो काहींना विजयापर्यंत नेणार तर काहींची अडचण बनणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.