Maan News : पोळ तात्यांच्या रूपाने राजकारणातील देव माणूस आम्हाला भेटला : निलेश लंके

Nilesh Lanke मार्डी (ता. माण ) येथे दिवंगत माजी आमदार सदाशिवराव पोळ तात्या यांच्या निवासस्थानी आमदार निलेश लंके यांनी सदिच्छा भेट दिली.
MLA Nilesh Lanke, Manoj Pol, Sonali Pol
MLA Nilesh Lanke, Manoj Pol, Sonali Polsarkarnama

-सल्लाउद्दीन चोपदार

Mhaswad News : गेली अनेक वर्षे माण तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जात होता, अशा परिस्थितीत माजी आमदार सदाशिवराव पोळ Sadashivrao Pol तात्यांनी या भागाचे नेतृत्व केले. मी आमदार नव्हतो तेव्हापासून श्री. पोळ तात्यांना भेटत होतो. त्याचवेळी राजकारणातील हा देव माणूस मला भेटला, अशी अतिशय भावनिक प्रतिक्रिया पारनेरचे आमदार निलेश लंके Nilesh Lanke यांनी व्यक्त केली.

माण तालुक्यातील वरकुटे(माळवाडी)येथे जनार्धन विरकर यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा, शर्यती उदघाट्न कार्यक्रमासाठी जाताना मार्डी (ता. माण ) येथे दिवंगत माजी आमदार सदाशिवराव पोळ तात्या यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते मनोज पोळ, सोनालीताई पोळ यांची उपस्थिती होती.

आमदार निलेश लंके म्हणाले, श्री.पोळ तात्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून श्री. पोळ तात्यांनी महाराष्ट्रात आपल्या कामाने व कर्तृत्वाने ओळख निर्माण केली होती. माण विधानसभा मतदारसंघ राखीव असताना पोळ तात्या आमदार निवडून आणतात. हे आम्ही पवार साहेबांकडून नेहमी ऐकत होतो. कारण आमच्या भागात अनेक जाहीर सभा मधून साहेबांच्या भाषणात तात्यांच्या नावाचा उल्लेख असायचा.

MLA Nilesh Lanke, Manoj Pol, Sonali Pol
Maan : माढा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून देणार.... जयकुमार गोरे

पवार साहेब म्हणायचे इकडे आमदार होण्यासाठी व तिकीट मागण्यासाठी चढाओढ असते. मात्र सातारा जिल्यातील माण तालुक्यात माझा एक सदाशिवराव पोळ नावाचा कार्यकर्ता आहे, की जो आमदार निवडून आणतो. त्यावेळी खरचं वाटायचं की असा कोण माणूस असेल की जो आमदार निवडून आणतो. मात्र, नंतरच्या काळात पवार साहेबांनी तात्यांना तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबरोबर आमदारकी दिली.

MLA Nilesh Lanke, Manoj Pol, Sonali Pol
Satara BJP : फडणवीस यांना फडतूस म्हणणं म्हणजे उद्धव ठाकरेंचा बालिशपणा : शिवेंद्रराजे

त्याच वेळी मात्र पोळ तात्या आम्हाला कळले की हेच ते आमदार निवडून आणणारे पोळ तात्या. ज्या ज्या वेळी पोळ तात्यांना भेटलो, त्या त्या वेळी राजकारणातील बारकावे तात्या सांगायचे. तात्याचं बोलण तासंतास ऐकत बसावं असच वाटायचं. पोळ तात्यांचं बोलण, वागण, कामाची चिकाटी, जवळून पहिली व तात्याच्या रूपाने राजकारण व समाजकारणातील देव माणूस आम्हाला त्यावेळी भेटला.

MLA Nilesh Lanke, Manoj Pol, Sonali Pol
Maan : इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसाठी नागरीक आक्रमक; म्हसवडला रविवारी आक्रोश मोर्चा...

ही आठवण आजही आहे, असे त्यांनी सांगितले. तात्याच्या आठवणी सांगताना आमदार निलेश लंके यांना भरून आले. युवा नेते मनोजदादा पोळ व सोनालीताई पोळ यांनी आमदार निलेश लंके याचे स्वागत केले.यावेळी भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MLA Nilesh Lanke, Manoj Pol, Sonali Pol
Nilesh Lanke News : येत्या महिना दीड महिन्यात पुन्हा आपलेच सरकार येणार; लंकेंच्या विधानाने चर्चांना उधाण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com