Maan : इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसाठी नागरीक आक्रमक; म्हसवडला रविवारी आक्रोश मोर्चा...

माण तालुक्यातील Maan taluka म्हसवड, मासाळवाडी, धुळदेव व माळशिरस तालुक्यातील गारवड येथे केंद्र सरकारनेCentral Government बंगळूर-मुंबई इकॉनॉमिक इंडस्ट्रीयल कॉरिडॉर Economic Industrial Corridor स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.
Mhaswad MIDC
Mhaswad MIDCsarkarnama
Published on
Updated on

म्हसवड : माण तालुक्यातील म्हसवड, मासाळवाडी, धुळदेव व माळशिरस तालुक्यातील गारवड येथे केंद्र सरकारच्या बंगळूर-मुंबई इकोनॉमिक इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचे काम रेंगाळले आहे. त्यामुळे ते तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी सातारा, सोलापूर सांगली जिल्ह्यातील नागरिक म्हसवडला येत्या रविवारी सर्व पक्षीय आक्रोश मोर्चा काढून 'रास्ता रोको' आंदोलन करणार आहेत, अशी माहिती माण देश म्हसवड कॉरिडॉर बचाव संघर्ष समितीचे धनंजय ओंबासे व कृष्णा खोरे पाणी संघर्ष समितीचे डॉ. महादेव कापसे, दिलीप तुपे यांनी दिली आहे.

यासंदर्भात श्री. ओंबासे, डॉ. कापसे, श्री. पुते म्हणाले, नियोजित बंगळूर-मुंबई आर्थिक कॉरिडॉर म्हसवडला होणे माणदेशासाठी महत्त्‍वाचे आहे. त्यासाठी संघर्ष समिती करत असलेल्या संघर्षाला माणदेशातील युवकांसह सामान्य जनतेने साथ देण्याची आवश्यकता आहे. माणदेशाच्या भवितव्यासाठी माणदेशातील सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधी, नेत्यांनी मतभेद विसरून कॉरिडॉर म्हसवडलाच होण्यासाठी संघर्ष समितीसोबत मैदानात उतरण्याची गरज आहे.

Mhaswad MIDC
MIDC : आमदार गोरेंमुळेच म्हसवडची एमआयडीसी कोरेगावला स्थलांतरीत.... रामराजे

यासाठी संघर्ष समितीसमवेत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, शिवसेनेचे नेते शेखर गोरे, डॉ. संदीप पोळ, अनिल देसाई, अभयसिंह जगताप आदींसह माणदेशातील सर्व पक्षिय नेतेमंडळी, सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.

Mhaswad MIDC
एमआयडीसी पळवून नेणाऱ्यांचा कट जयकुमार गोरे हाणून पाडणार...

राज्य शासनाकडून पुढील कार्यवाहीचे आदेश तातडीने व्हावेत या मागणीसाठी रविवारी महात्मा गांधी जयंती निमित्त शांततेने म्हसवड येथे सकाळी दहा वाजता नागरिकांचा मोर्चा व रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com