Shaktipeeth highway : शक्तिपीठ महामार्गावरून धरपकड, विरोधकाला सोडून समर्थकालाच उचलले, पोलिसांच्या अजब कारभाराची गजब कहाणी

Shaktipeeth Highway News : कोल्हापूर जिल्ह्यासह सह सांगलीमध्ये शक्तिपीठ महामार्ग प्रश्न मोठ्या प्रमाणावर शेतकरी एकवटले आहेत शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केला असून अनेकदा सरकार विरोधात भूमिका घेतली आहे
Shaktipeeth highway
Shaktipeeth highway
Published on
Updated on

Kolhapur News : शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर सांगलीसह राज्यात विरोध होत असला तरीदेखील हा महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासन रेटत आहे. आता तर या महामार्गाच्या पर्यावरणीय पाहणीला देखील मंजुरी केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे हा महामार्ग शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारला जाणार हे पक्क झाला आहे. यादरम्यान शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापूरमध्ये येणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोध करण्याची भूमिका कागलसह भुदरगड मधील शेतकऱ्यांनी घेतली होती. यावरून पोलिसांनी त्यांची धरपकड केली. पण या धरपकडीत पोलिसांचा अजब कारभाराची गजब कहाणी समोर आली आहे. या धरपकडीत विरोधकांसह समर्थकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पोलिसांच्या या अजब कारभाराची जगब कहाणीची जोरदार चर्चा रंगली आहे.

शक्तिपीठ महामार्गाला राज्यात विरोध असतानाही सरकारने शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या नोटीस काढल्या आहेत. धाराशिव ते कोल्हापूरपर्यंत भूसंपादन केले जात आहे. दरम्यान आता पर्यावरणीय पाहणीलाही केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कामाला आता आणखीन गती येणार आहे. या अभ्यासात पर्यावरणीय मुलांकनामध्ये धाराशिव ते कोल्हापूर या 324 किलोमीटर अंतरावरील पर्यावरणाच्या संभाव्य आणि नुकसानीचा अभ्यास केला जाणार आहे.

ज्यामध्ये नदी, नाले, वृक्षतोड, खोदकाम, शेतीचे नुकसान, जंगलाची आणि जमिनीची हानी यांचा अभ्यास होणार आहे. तसेच कमीत कमी हानी कशी होईल यासाठी, हा आराखडा तयार केला जाणार आहे. यावर उपाययोजना सुचवल्या जाणार आहेत. हा आराखडा येत्या तीन ते चार महिन्यात पाहणी करून केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे. मात्र तोपर्यंत राज्य सरकार या महामार्गाला गती देऊन भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडणार आहे.

Shaktipeeth highway
Shaktipeeth expressway : सरकारने बाहेरचा रस्ता दाखवलेल्या शिक्षकासाठी शक्तिपीठ संघर्ष समिती उभारणार न्यायालयीन लढाई

पण या आधी कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावरून पोलिसांनी मोठी कारवाई करत विरोध करणाऱ्यांची धरपकड केली. ज्यात कागल भुदरगड मधील शेतकऱ्यांचा समावेश आहे. याच शेतकऱ्यांनी शिंदे यांच्या दौऱ्याला विरोध करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही तालुक्यातील सुमारे 200 शेतकऱ्यांची धरपकड केली. त्यांना शेंडूर फाट्यावर असणाऱ्या आयटीआय कॉलेजमध्ये स्थानबद्ध केले. यामध्ये शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती संघर्ष समिती, महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या नेत्यांचा समावेश होता.

शिंदे यांच्या दौऱ्याच्या आधीच आम्ही गनिमी कावा करू आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांना विरोध करू, असे नेत्यांनी जाहीर केले होते. या इशाऱ्याने पोलिसांची प्रचंड धावपळ उडाली होती. शिंदे यांच्या दौऱ्याच्या आधीच नेते जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांची धरपकड करण्यात आली. ठाकरे गटाचे नेते विजय देवणे यांच्या घराची झाडाझडती पोलिसांनी घेतली. यावरून देवणे यांनी आंदोलन चिरण्यासाठी घरची झाडाझडती घेऊन कुटुंबाला नाहक त्रास दिल्या आरोप देवणे यांनी केला.

यावेळी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनाही पोलिसांनी नोटीस बजावली होती. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याबाबत अनेकदा आवाज उठवूनही तो शेतकऱ्यांवर थोपला जातोय. विधानसभा निवडणुकीपूर्वी शंभर दिवसात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाईल, अशी आश्वासने महायुती सरकारने दिली होती. शेतकऱ्यांच्या 6000 कोटींची एफआरपी देखील थकवली होती यावरून शेतकरी संतप्त झाले होते. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावरून सरकारला इशारा दिला होता. तसेच उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याला विरोध करू त्यांचा ताफा आडवू अशा पद्धतीने इशारा दिला होता. यावरूनदेखील स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा काढल्या.

समर्थकालाच उचलले

शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध होत असताना पोलिसांनी धरपकड करण्याची भूमिका बजावली. अनेक विरोधकांना त्यांनी स्थानबद्ध केले. दरम्यान हातकणंगले येथील रुकडी माणगावमध्ये मात्र वेगळाच प्रकार समोर आला आहे. येथे पोलिसांनी अजब कामगिरी बजावली असून सध्या याची चर्चा सुरू आहे.

Shaktipeeth highway
Shaktipeeth : फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला विरोध करणं शिक्षकाला महागात; कोल्हापूर मनपाने दाखवला घरचा रस्ता

शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी विरोधकाला सोडून समर्थक असणाऱ्या प्रकाश पाटील यांची धरपकड केलीय. माणगाव हे शक्तिपीठ महामार्गात बाधित होणारे मोठे आणि प्रमुख गाव असून उपमुख्यमंत्री शिंदे यांना रोखण्याकरता येथील कार्यकर्ते जाणार होते. पण याआधीच या कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी केली. याचवेळी पोलिसांनी पाटील यांना देखील ताब्यात घेतले. यावेळी पाटील हे शक्तिपीठ समर्थक असल्याची माहिती सरपंच आणि सदस्यांनी पोलिसांना दिल्यानंतर त्यांची सुटका झाली. सध्या हा विषय चर्चेचा ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com