Ramraje Naik Nimbalkar Vs Jaykumar Gore : रामराजे नाईक निंबाळकरांच्या घरी पोलिस, मंत्री गोरेंच्या बदनामी, खंडणी प्रकरणी चौकशी

Police Visit Ramraje Naik Nimbalkar Residence : रामराजे नाईक निंबाळकर यांना चौकशीला हजर राहण्यासाठी वडूज पोलिसांनी नोटीस दिली होती. मात्र, या नोटीशीनंतर देखील रामराजे हे पोलिस ठाण्यात हजर राहिले नव्हते.
Police arrive at Ramraje Naik Nimbalkar’s home for inquiry linked to Jaykumar Gore defamation and extortion case.
Police arrive at Ramraje Naik Nimbalkar’s home for inquiry linked to Jaykumar Gore defamation and extortion case.sarkarnama
Published on
Updated on

Jaykumar Gore Extortion Case : महिलेने मंत्री जयकुमार गोरे यांना बदमानीची धमकी देत खंडणीची मागणी केली होती. महिलेला खंडणी घेत असताना पोलिसांनी अटक देखील केली होती. या प्रकरणात चौकशीसाठी माजी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे खळबळ उडाली होती. आज (शुक्रवार) थेट वडूज पोलिस रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झाले आहेत.

मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी एका पत्रकाराला अटक करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांची देखील या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. त्यांना देखील चौकशीसाठी नोटीस देण्यात आली होती.

Police arrive at Ramraje Naik Nimbalkar’s home for inquiry linked to Jaykumar Gore defamation and extortion case.
Operation Sindoor:सैन्यांची ताकद आणखी वाढणार; मोदी पुरवणार मोठी 'रसद'; हिवाळी अधिवेशनात मिळणार मंजुरी

रामराजे नाईक निंबाळकर यांना चौकशीला हजर राहण्यासाठी वडूज पोलिसांनी नोटीस दिली होती. मात्र, या नोटीशीनंतर देखील रामराजे हे पोलिस ठाण्यात हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्या निवास्थानी पोलिस दाखल झाले आहेत. 'साम टिव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार खंडणी मागणारी महिला आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये फोनवर बोलणे झाल्याचे सांगितले जात आहे. त्यासंदर्भात पोलिस चौकशी करत आहेत.

गोरेंच्या बदनामीमागे रामराजे असल्याचा आरोप

भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मागली काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या दौऱ्यावर असताना मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीमागे रामराजे नाईक निंबाळकरांचा हात असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते की, ज्या महिलेवर आरोप आहेत तीने रामराजेंशी फोनद्वारे संवाद साधला होता त्याचे ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. त्यामध्ये ती महिला रामराजेंना तुम्हीच एकमेवा आधार आहात असे म्हणत आहेत. त्यावरून सत्य काय ते कळते, असे देखील रणजितसिंह म्हणाले होते.

Police arrive at Ramraje Naik Nimbalkar’s home for inquiry linked to Jaykumar Gore defamation and extortion case.
Kangana Ranaut : मोदी लिजेंडचे बाप म्हणणाऱ्या कंगना रणौतची माघार, 'ते' ट्विट डिलीट करत दिले स्पष्टीकरण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com