Kolhapur Politics 2024 : प्रस्थापितांना राजकीय उंची दाखवली, 2024 वर्षाने कोल्हापूरच्या राजकरणात झालेले बदल...

New Equations in Kolhapur Politics : 2024 या वर्षात जिल्ह्याच्या राजकारणात प्रस्थापितांना ताळ्यावर आणले. तर अनेक नेत्यांना त्यांच्या जागा दाखवली.
Satej Patil | Hasan Mushrif | Sanjay Mandlik
Satej Patil | Hasan Mushrif | Sanjay MandlikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : या सरत्या वर्षापर्यंत कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकरणात महत्वाचे बदल घडले आहेत. बदलेल्या राजकीय घडामोडीमुळे नवीन समीकरणे उदयाला आली आहेत. मागील दशकात जिल्ह्याच्या राजकरणावर अधिराज्य गाजवणार्‍या सत्तास्थानाला जनतेने जागा दाखवली तर लोकसभा निवडणुकीत लाटेत निवडून आलेल्या नेत्यांना अस्मान दाखवले. त्यामुळे 2024 या वर्षात जिल्ह्याच्या राजकारणात प्रस्थापितांना ताळ्यावर आणले. तर अनेक नेत्यांना त्यांच्या जागा दाखवली.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत महाडीक गटाने पाटील गटाला धोका दिल्याने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आपल ठरलंय अशी गर्जना करत कांग्रेस नेते सतेज पाटील यांनी महाडीक गटाला धक्का दिला. 2019 ची लोकसभा, विधानसभा बरोबर गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पराभव केला. महाडीक गटाचे अस्तित्व संपवण्यासाठी सतेज पाटील यांची प्रत्येक चाल यशस्वी ठरली.

2019 विधानसभेनंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. तत्कालीन वेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने याच्यासह आमदार प्रकाश आवाडे आणि विनय कोरे वगळता सर्व आमदार सतेज पाटील यांच्यासोबत राहिले. तर गोकुळमध्ये विनय कोरे हे पाटील यांच्यासोबत राहिले.

राज्यसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धंनजय महाडीक यांचे राजकीय पुनर्वसन केले. पण मध्यंतरीच्या काळात राज्यात सत्ताबादलाचा परिणाम जिल्ह्याच्या राजकरणावर झाला. मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील आणि शिवसेनेचे आमदार प्रकाश अबिटकर, राजेंद्र पाटील यड्रावकर हे महायुतीत दाखल झाले. त्यामुळे कोंग्रेस नेते सतेज पाटील यांची ताकद कुमकुवत झाली.

पीएन तरीही जिल्ह्यातील चार विधानसभा आणि एक विधानपरिषदेच्या आमदारांचा पाठिंबा त्यांच्या बाजूने राहिला. मागील चार वर्षातील राजकरणात जिल्ह्याच्या राजकरणावर कोंग्रेस नेते सतेज पाटील यांचा प्रभाव राहिला.

Satej Patil | Hasan Mushrif | Sanjay Mandlik
Dhananjay Munde : 'धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी काही भूमिका घेईल ती आम्हाला...',NCP च्या 'या' नेत्याचे मोठे संकेत

2024 हे वर्ष जिल्ह्यातील राजकीय समीकरण आणि निवडणुकीने गाजले. महाविकास आघाडीच्या काळातील असलेली राजकीय समीकरण महायुती सरकारच्या काळातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेली.

लोकसभा निवडणूक जाहीर होताच जिल्ह्यातील महायुतीमधील सर्व नेते खांद्याला खांदा लावून लढत होती. कोल्हापूर आणि हातकंगले लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघातील सर्वच विरोधक लोकसभेला गळ्यात गळे घालून प्रचार करत राहिले.

हातकंनगले मधील इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील कट्टर राजकीय विरोधक माजी आमदार सुरेश हाळवनकर,तर कोल्हापूर लोकसभेतील राधांनगरीतिल आमदार प्रकाश अबिटकर, माजी आमदार के पी पाटील, कागलचे मंत्री हसन मुश्रीफ, समरजित घाटगे, हे प्रमुख लोकसभेत एकत्र दिसले.

मात्र लोकसभा निवडणुकीत अंतर्गत गटबाजीच फायदा कोंग्रेस नेते सतेज पाटील यांनी उचलला. कोल्हापूर लोकसभा मतदार संघात महायुतीच्या नेत्यांचे पारडे जड असताना देखील महायुतीच्या संजय मंडलिक यांना परभवाला सामोरे जावे लागले. तर हातकंगले मधून महायुतीचे धैर्यशील माने विजयी झाले. पण कोल्हापूर लोकसभा मतदार संघात झालेल्या कोंग्रेसच विजय आमदार सतेज पाटील यांच्या पथ्यावर पडला.

महायुती म्हणून प्रभावित झालेल्या नेत्यांना जनतेने जागा दाखवली. तर दुसरीकडे लोकसभेच्या विजयाने हुरळून गेलेल्या काँग्रेसने जिल्ह्यातील राजकरणावर पकड ठेवण्यासाठी विधानसभेच्या जोडण्या केल्या.

Satej Patil | Hasan Mushrif | Sanjay Mandlik
Santosh Deshmukh Murder Case : मंत्री आठवलेंना अंजली दमानियांनी ऐकविला 'व्हॉईस मेसेज'; 'मोठी' मागणी करताना व्यक्त केली 'ही' भीती, पण...

लोकसभा निवडणुकीनंतर दोन ते तीन महिन्यांनी विधानसभा निवडणूक झाल्या. या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पूरक वातावरण तयार झाले. अनेक मतदारसंघात महायुतीमध्ये उमेदवारीवरून वाद झाल्यानंतर काहीजणांनी महाविकास आघाडीचा रस्ता धरला. लोकसभेत एकत्र असणारे कागल विधानसभा मतदारसंघातील नेते आपापसात भिडले.

मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे तर राधानगरी मधून आमदार प्रकाश आबिटकर विरुद्ध माजी आमदार के पी पाटील असा सामना रंगला. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात समझोता एक्सप्रेस धावत हळवणकर आणि प्रकाश आवाडे  राहुल आवाडे यांच्यासाठी मैदानात उतरले. लोकसभा निवडणुकीप्रमाणे महाविकास आघाडीला यश मिळण्याचा अंदाज असतानाच जिल्ह्याच्या राजकारणात निकाल वेगळाच लागला.

जिल्ह्याच्या नऊ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले. तर चंदगड विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विजयी झाल्यानंतर ते भाजपात दाखल झाले. मात्र काँग्रेसने ज्या पाच जागा जागा वाटपात मिळवल्या त्या पाच ही जागा काँग्रेसला राखता आल्या नाहीत. ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी शरद पवार चंद्र पवार पक्षाचे पानिपत झाले.  एकंदरीतच काँग्रेसने ते सतीश पाटील यांच्या नेतृत्वाला हा धक्का मानला जात होता. हा विकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी सतेज पाटील यांनी महत्वपूर्ण जोडण्या केल्या होत्या.

मात्र लाडक्या बहिणी, सरकारच्या विविध योजनेचा परिणाम विधानसभा निवडणुकीत झालेला दिसून आला. जिल्ह्याच्या एका ही जागेवर महाविकास आघाडीला विजय मिळवता आल्याने महाविकास आघाडीचे नेतृत्व संपुष्टात आले.

एकीकडे जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दशकभरात अधिराज्य गाजवणाऱ्या सतेज पाटील यांना विधानसभेच्या पराभवामुळे धक्का मिळाला होता. तर मागील पाच वर्षात ज्यांचा पराभव झाला त्यांना राजकीय उभारी मिळाली होती. गेल्या दशकभरातील राजकारण पाहता 2024 या वर्षाने कोणाला राजकीय उंचीवर लिहून ठेवले तर कोणाची राजकीय उंची कमी केली हे नक्की.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com