Kolhapur Municipal Election : राजकीय पक्षांकडून उमेदवारांची खिचडी; शेवटच्या क्षणी मारलेल्या कोलांट्या उड्यांनी नेत्यांचं टेन्शन वाढलं!

political party candidate confusion : शेवटच्या क्षणी उमेदवार बदल आणि कोलांटउडीमुळे राजकीय पक्षातील नेत्यांचा तणाव वाढला आहे
Kolhapur News
Kolhapur NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics : कोल्हापूरमध्ये महिनाभरापासून प्रचाराच्या रणांगणात उतरलेल्या इच्छुक उमेदवारांना ऐनवेळी पक्षाने तिकीट नाकारले. त्यामुळे संतापलेल्या आणि नाराज झालेल्या इच्छुक उमेदवारांनी थेट विरोधी पक्षांचाच आधार घेतला. ही गोष्ट केवळ महायुतीत नव्हे तर महाविकास आघाडीतील सर्वच पक्षात पाहायला मिळते.

एकंदरीतच कोल्हापूर महापालिकेच्या रणांगणात सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची खिचडी केल्याने शेवटच्या क्षणापर्यंत अनेक उमेदवारांनी कोलांट्या उड्या मारल्या. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांचं टेन्शन वाढले आहे. तर काही ठिकाणी आपलाच उमेदवार इतर पक्षातून उभा केला आहे. उद्यापासून दोन दिवस उमेदवारी अर्ज माघार होणार असल्याने त्याला आणखी चुरस निर्माण होणार आहे.

निवडणूक लढवायचीच; पण जागा मित्रपक्षाला, त्यात आरक्षण आडवे, अशा साऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी अनेकांना आतापर्यंत काम केलेल्या पक्षातून बाहेर पडून नवीन पक्षाला जवळ करावे लागले आहे. त्याचबरोबर अनेकांनी महायुतीमध्ये, तसेच इतर पक्षांतून उमेदवारी मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अपक्ष लढवण्याचा उमेदवारी अर्ज दाखल केला, तर काहींना नवीन पक्षांचा आधार घ्यावा लागला. यामुळे आज कुणी, कोणत्या पक्षातून अर्ज दाखल केला, याबाबत कार्यकर्ते देखील चौकशी करताना दिसले.

निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत सुरू असलेल्या उमेदवारीच्या घोळामुळे इच्छुकांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. त्यामुळे अनेकांनी अर्ज भरून ठेवले होते. शेवटच्या दिवशी पक्षाचा ए, बी फॉर्म भरायचा, असे नियोजन केले होते. काँग्रेसमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांना संधी मिळाली नसल्याचे अनेक प्रभागात उघड झाले. त्यामुळे तेथील इच्छुकांनी नवीन पक्षाचा विचार सुरू केला होता. अनेकांनी चर्चा सुरू केली होती. आज शेवटच्या दिवशी त्यावर निर्णय घेऊन त्या-त्या पक्षांची उमेदवारी घेतली.

Kolhapur News
PMC Elections BJP : आमदार, खासदारांना दणका; तब्बल 90 महिलांना संधी : पुण्यातील भाजपच्या सर्व 165 उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर

महायुतीमध्येही अनेकांना संधी मिळणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यातीलही इच्छुकांनी पर्याय शोधले होते. त्यातील अनेकांनी जनसुराज्यची उमेदवारी घेतली आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या काही इच्छुकांना महायुतीच्या जागांमध्ये स्थान देण्यात आले. महायुतीतील काहींना काँग्रेसमधूनही उमेदवारी दिली आहे. यामुळे सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी दिसली. एकीकडे इच्छुकांना उमेदवारी मिळत नसल्याने नाराजी असताना महायुतीतील काही जागा काही पक्षांसाठी सोडल्याने तिथे ताकदवान उमेदवार कोण द्यायचा, हा प्रश्न होता. त्यासाठी तीन मित्रपक्षांनी एकमेकांसाठी उमेदवारांची अदलाबदली केल्याचे उमेदवारी यादीवरून दिसून येते.

पक्षबदल केलेलं उमेदवार :

नाव - नवा पक्ष - जुना पक्ष

सुनील कदम-शिवसेना- भाजप

शारंगधर देशमुख- शिवसेना- काँग्रेस

उत्तम कोराणे- भाजप- राष्ट्रवादी

प्रकाश नाईकनवरे- शिवसेना- ताराराणी आघाडी-

संजय सावंत-शिवसेना- भाजप

Kolhapur News
Government Holiday : 'या' तारखेला महाराष्ट्रात सरकारी सुट्टी जाहीर! शाळा-कॉलेजही राहणार बंद, पण नक्की कारण काय?

अनुराधा खेडकर- शिवसेना- राष्ट्रवादी

शिवतेज खराडे- शिवसेना - काँग्रेस

अंजली जाधव- शिवसेना- काँग्रेस

प्रियांका उलपे- शिवसेना-भाजप

यशोदा मोहिते- राष्ट्रवादी- ताराराणी आघाडी

संगीता पोवार- शिवसेना- राष्ट्रवादी

नियाज खान- शिवसेना उभाठा - राष्ट्रवादी

रखींद्र मुत्गी- राष्ट्रवादी- भाजप

प्रणोती पाटील- काँग्रेस- भाजप

दत्ताजी टिपुगडे- शिवसेना- काँग्रेस

राजेंद्र पाटील- राष्ट्रवादी- शिवसेना

विद्या देसाई- राष्ट्रवादी शरद पवार गट- काँग्रेस

महेंद्र चव्हाण- काँग्रेस- राष्ट्रवादी

मायादेवी भंडारे- तिसरी आघाडी- शिवसेना

अक्षय जरग- जनसुराज्य- काँग्रेस

पद्यजा भुर्के- जनसुराज्य- काँग्रेस

रमेश खाडे- जनसुराज्य- शिवसेना

प्रसाद चब्हाण- जनसुराज्य- शिवसेना

शारदा देवणे- जनसुराज्य- राष्ट्रवादी

प्रीती चव्हाण- जनसुराज्य-भाजप

मधुरिमा गवळी- जनसुराज्य भाजप

शेखर जाधव- जनसुराज्य- काँग्रेस

रणजित मंडलिक- जनसुराज्य- शिवसेना

पूजा शिरालकर-जनसुराज्य-भाजप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com