Thackeray- Shinde Dispute : कमानीच्या वादातून मिरजेत राजकारण तापलं; ठाकरे-शिंदे गट आमनेसामने

Sangli Thackeray-Shinde Politics : मार्केट यार्ड परिसरात उभारण्यात येणाऱ्या स्वागत कमान उभारण्यावरून हा वाद सुरू झाला.
Sangli Thackeray-Shinde Politics :
Sangli Thackeray-Shinde Politics : Sarkarnama
Published on
Updated on

राहुल गडकर

Sangali Political News : राज्याच्या राजकारणात ठाकरे-शिंदे गट असे दोन गट पडल्यापासून दोन्ही गटांतील संघर्ष अगदी स्थानिक पातळीपर्यंत पोहाेचला आहे. असे असतानाच सांगलीतील मिरजेत शिंदे आणि ठाकरे गट पुन्हा आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. मिरजेतील गणेशोत्सवाच्या स्वागत कमानीवरून हा दोन्ही गटांतील वाद शिगेला पोहाेचला होता. पण तितक्यात पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद तिथेच मिटवला आणि पुढचा अनर्थ टळला.

मार्केट यार्ड परिसरात उभारण्यात येणाऱ्या स्वागत कमान उभारण्यावरून हा वाद सुरू झाला. पण दोन्ही गटांनी त्या ठिकाणी दावा केल्यानंतर पोलिसांनीच मध्यस्थी करून दोन स्वतंत्र कमानी उभारण्याचा तोडगा काढला आहे. यानुसार दोन्ही गटाला मार्केट यार्ड परिसरात कमान उभारण्यास परवानगी नाकारली; पण लक्ष्मी मार्केट इमारतीसमोर शिंदे गटाला व किल्ला रस्त्यावर ठाकरे गटाला स्वागत कमान उभारण्यासाठी परवानगी दिली आहे.

Sangli Thackeray-Shinde Politics :
Navneet Rana and Ravi Rana: हनुमान चालीसा पठण प्रकरण : कोर्टाने फटकारल्यानंतरही राणा दाम्पत्याची सुनावणीला दांडी

उत्सव विसर्जन मार्गावर मोठमोठ्या स्वागत कमानी उभारण्याचे मिरजेचे वैशिष्ट्य आहे. मिरजेतील कमानी पाहण्यासाठी राज्यभरातून हौशी लोक इथे दाखल होत असतात. या स्वागत कमानीवर देखावे केले जात असल्याने राज्यभर त्यांची चर्चा असते. मात्र, याच कमानीवरून मिरजमधील शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने आल्याने वादाची थिणगी पडली होती.

दरम्यान, गेल्या वर्षी शिंदे गटाने मार्केट परिसरात उभारण्यात येणाऱ्या स्वागत कमानीवर दावा केला होता; पण ठाकरे गटानेही त्याच ठिकाणी दावा केल्याने दोन्ही गटांत त्याचवेळी वादाची थिणगी पडली होती. पोलिसांना ही बाब कळताच त्यांनी दोन्ही गटांत मध्यस्थी करून दोन कमानी उभारण्याचा तोडगा काढला आणि एक ठाकरे गटाची कमान तसेच त्यासमोर शिंदे गटाला स्वागतकक्ष उभारण्यास परवानगी देऊन हा वाद मिटविला होता.

पण या वर्षी पुन्हा शिंदे गटाचे शहरप्रमुख किरणसिंग रजपूत यांनी शिवसेनेच्या स्वागत कमानीवर दावा केल्याने ठाकरे गटाने विरोध केला. शिवसेना कोणाची या वादाबाबत निवडणूक आयोगाने निर्णय दिल्याने स्वागत कमान आमचीच असा शिंदे गटाचा दावा होता. शिवसेनेचे नाव व चिन्ह शिंदे गटाला मिळाले असल्याने पक्षाच्या स्वागत कमानीसाठी शिंदे गटाने आग्रह धरल्याने ठाकरे गटानेही त्या जागेवर दावा केला. या वादामुळे दोन्ही गटांना कमान उभारण्याची परवानगी न देण्याचा पोलिसांनी निर्णय घेतला. पण दोन्ही गटांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्वागत कमान उभारण्याची परवानगी देत हा वादही सोडवला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Sangli Thackeray-Shinde Politics :
Fadnavis On Sunil Kendrekar Report : सुनील केंद्रेकरांचा अहवाल हा अधिकृत समितीचा नव्हता; पण... ; फडणवीस अखेर बोलले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com