Kolhapur Gokul Sabha: 'गोकुळ'ची सभा वादळी : मूळ सभासद गप्प; पण कार्यकर्त्यांचे आकांडतांडव

Mahadik Group Vs Satej Patil : 'गोकुळ'च्या वार्षिक सर्वसाधारण सभेवरून कोल्हापुरात राजकारण तापलं
Mahadik Group Vs Satej Patil
Mahadik Group Vs Satej Patil Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: शेतकऱ्यांचा आणि दूध उत्पादकांचा आर्थिक कणा समजल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडत आहे. मात्र, गोकुळची सभा आणि गोंधळ हे एक समीकरणच झाले आहे. 'गोकुळ'च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यकर्त्यांचा राडा आणि घोषणाबाजी हे नित्याचं झालं आहे.

वर्षभर 'गोकुळ'ला वाचवा म्हणून सांगणारे लोकप्रतिनिधी मात्र दूध उत्पादकांचे आणि 'गोकुळ'चे हित पाहत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आजच्या या सभेत व्यासपीठासमोरच दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळामुळे मूळ सभासदांना गप्प राहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे मूळ सभासद गपगुमान अन् कार्यकर्त्यांचे आकांडतांडव, अशी परिस्थिती दिसून येत आहे.

Mahadik Group Vs Satej Patil
Kolhapur Gokul Sabha News : 'गोकुळ'च्या सभेपूर्वीच गोंधळ; बॅरिकेड्स तुटले, घोषणाबाजी करत महाडिक गट आक्रमक..

'गोकुळ'च्या सभेला सुरुवात होण्यापूर्वीच जोरदार घोषणाबाजी करत महाडिक समर्थक सभेत घुसले. पोलिसांकडून ठराव पाहूनच सभासदांना सोडले जात असताना यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सभासदांनी सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेट्स तोडून सभेच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रचंड गोंधळ आणि तणाव निर्माण झाला.

पाटील आणि महाडिक अशा दोन्ही गटाचे कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी एकत्र आल्यामुळे प्रचंड घोषणाबाजी पहायला मिळाली. 'गोकुळ'च्या या सर्वसाधारण सभेसाठी ग्रामीण भागातून दूरवरून सभासद आले.

पण या सभासदांना 'गोकुळ'चे अध्यक्ष महोदय काय बोलतात? ते काय वाचत आहेत ? हे कळायला मार्ग नव्हता. त्यांच्याकडे फक्त गप गुमान बसल्याशिवाय पर्याय नव्हता. केवळ कार्यकर्त्याची दंगाबाजी पहायला आलो की काय ? अशी चर्चा महिला व इतर सभासदांमध्ये सुरु होती.

Edited by - Ganesh Thombare

Mahadik Group Vs Satej Patil
Satej Patil On Gokul Sabha : गोकुळच्या सभेत 'ते' नेहमी गुंड घेऊन येतात; सतेज पाटलांचा महाडिकांवर निशाणा !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com