Satej Patil On Gokul Sabha : गोकुळच्या सभेत 'ते' नेहमी गुंड घेऊन येतात; सतेज पाटलांचा महाडिकांवर निशाणा !

Mahadik Group Vs Satej Patil : "दूध उत्पादकांची गोकुळची सभा शांततेत पार पाडायची आहे.."
Kolhapur Gokul News
Kolhapur Gokul NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वीच महाडिक गटाचे कार्यकर्ते सभास्थळी घुसल्यानंतर 'गोकुळ'चे वातावरण तणावपूर्ण बनले आहे. प्रस्तावित ठरावावर काही सभासदांनी आक्षेप घेतला. महाडिक कार्यकर्ते थेट बॅरिकेट तोडून सभेमध्ये घुसले. यामुळे सभास्थळी मोठा गोंधळ माजला होता. पाटील-महाडिक गटात हा संघर्ष उफाळून आल्यावर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी महाडिक गटावर गंभीर आरोप केले आहेत. (Latest Marathi News)

गोकुळची सर्वसाधरण सभा सुरू होण्यापूर्वीच महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. महाडिक गटाचे समर्थक सभेमध्ये घुसल्यानंतर सतेज पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले, "गोकुळच्या सभेला महाडिक कायमच गुंड घेऊन येतात. ते आताही गुंड घेऊन आले आहेत. पण, दूध उत्पादकांची गोकुळची सभा आम्हाला शांततेत पार पाडायची आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाडिक गटावर टीका करण्याचे टाळत सावध भूमिका घेतली. महाडिक गट अशा पद्धतीचा गोंधळ घालेल, असे मला वाटत नाही, अशी सावध प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी दिली. मात्र कोल्हापुरात पुन्हा महाडिक- पाटील गट असा संघर्ष उफाळून आला आहे.

Kolhapur Gokul News
Kolhapur Gokul Sabha News : 'गोकुळ'च्या सभेपूर्वीच गोंधळ; बॅरिकेड्स तुटले, घोषणाबाजी करत महाडिक गट आक्रमक..

दरम्यान, सभास्थळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड तणाव आहे. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू असून, त्यांना शांततेचे आवाहन करण्यात येत आहे. दोन्ही गटाकडून आपापल्या नेत्यांचे फलक आणि झेंडे फडकवले जात आहेत. या सभेच्या ठिकाणी प्रचंड राजकीय चढाओढ दिसून येत आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com