गणपतराव आबांच्या नातवाने करुन दाखवले; सूतगिरणीच्या राजकारणाने सांगोल्याची दिशा ठरणार

Sangola Cooperative Mill Election : सांगोला सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षपदी डॉ. प्रभाकर माळी तर उपाध्यक्षपदी ऍड. नितीन गव्हाणे बिनविरोध
Sangola Cooperative Mill Election News
Sangola Cooperative Mill Election NewsSarkarnama

Sangola News : शेतकरी कामगार पक्षाचे नेते दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख (Ganpatarao Deshmukh) यांच्या निधनानंतर पहिल्याच झालेल्या शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या (Sangola Cooperative Mill Election) निवडणुकीत सर्वांनी एकत्रित येत बिनविरोध केली. संचालकांच्या बिनविरोध निवडणीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष कोणाची निवड होणार याकडे लक्ष लागले होते.

या अगोदर गेले काही वर्षे अध्यक्षपदी राहिलेले नानासाहेब लिगाडे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे यावर्षी अध्यक्षनिवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बिनविरोध झालेल्या संचालकांमध्ये माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे पुत्र चंद्रकांत देशमुख व आण्णासाहेब देशमुख या दोघांची वर्णी लागल्यामुळे दोघांपैकी एकाच अध्यक्षपदाची संधी मिळेल असे वाटत होते. मात्र, अचानकपणे सांगोला (Sangola) अर्बन बँकेचे अध्यक्ष असलेले डॉ. प्रभाकर माळी यांची वर्णी लागल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर उपाध्यक्षपदी ऍड. नितीन गव्हाणे यांची निवड झाली आहे.

Sangola Cooperative Mill Election News
तीस पदाधिकाऱ्यांनी ठाकरे-पवारांची साथ सोडली अन् सावंतांनी विरोधकांना ललकारले...

डॉ. प्रभाकर माळी हे सांगोला अर्बन बँकेचे अध्यक्ष आहेत व या अगोदरही होते. त्यामुळे त्यांना संस्थात्मक जबाबदारीची जाणीव आहे. यावेळी नूतन अध्यक्ष डॉ. प्रभाकर माळी यांचा सत्कार माजी अध्यक्ष नानासाहेब लिगाडे यांच्या हस्ते तर ऍड. नितीन गव्हाणे यांचा चंद्रकांत देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नुतन संचालक मंडळ - 

कापूस उत्पादक गट -

चंद्रकांत गणपतराव देशमुख (सांगोला)

अण्णासाहेब गणपतराव देशमुख  (सांगोला)

संतोष शांताराम पाटील (महूद)

नितीन कृष्णा गव्हाणे  (कडलास)

भारत हणमंत बंडगर  (अनकढाळ)

बाबासो रामचंद्र करांडे (लोटेवाडी)

विश्वंभर नारायण काशीद  (पंढरपूर)

Sangola Cooperative Mill Election News
Uddhav Thackeray : फडणवीसांच्या कौतुकानंतर राऊत शिंदे गटात जाणार का ? ; ठाकरे म्हणाले..

बिगर कापूस उत्पादक गट -

इंजि. मधुकर विठ्ठल कांबळे (सांगोला)

अंकुश लक्ष्मण बागल (खिलारवाडी)

विक्रांत महादेव गायकवाड (कडलास)

दिलीप शिवाजी देशमुख (कोळे)

संस्था प्रतिनिधी -

सागर भगवान लवटे (लोटेवाडी)

अनुसूचित जाती/जमाती -

बाळासाहेब संदिपान बनसोडे (सांगोला)

महिला राखीव -

ताई शिवाजी मिसाळ (पाचेगाव)

सीतादेवी सुनील चौगुले (गुंजेगाव, ता. मंगळवेढा)

इतर मागासवर्गीय -

प्रभाकर एकनाथ माळी (सांगोला)

वि.जा/ भ.ज./वि.मा.प्र.म -

कुंडलिक पंढरी आलदर (कोळे)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com