

अनगर नगरपंचायतीची पहिली निवडणूक:
स्थापनेनंतर प्रथमच होत असलेल्या अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत आज नगराध्यक्षपदासह नगरसेवकासाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यामध्ये प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे.
प्राजक्ता पाटील यांची निवड जवळपास निश्चित:
माजी आमदार राजन पाटील यांचे कुटुंब अनगरमध्ये प्रभावशाली असल्याने, प्राजक्ता पाटील या पहिल्या नगराध्यक्ष होण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जाते.
राजकीय परंपरा आणि कौटुंबिक वारसा:
लोकनेते (स्व.) बाबुरावअण्णा पाटील यांच्या परंपरेनुसार राजन पाटील, विक्रांत पाटील आणि अजिंक्यराणा पाटील यांनी स्थानिक एकजूट टिकवली असून नागरिकांचा विश्वास त्यांच्यावर कायम आहे.
Solapur, 11 November : स्थापनेनंतर प्रथमच होत असलेल्या अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये नगराध्यक्षपदासाठी माजी आमदार राजन पाटील यांच्या धाकट्या सूनबाई प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांनी, तर नारायण कल्याण गुंड आणि वैशाली विष्णु पाचपुंड यांचा समावेश आहे.
दरम्यान, प्राजक्ता पाटील यांना अनगरच्या (Angar) पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळणार आहे. कारण पाटलांचे अनगर आणि परिसरावर असलेले वर्चस्व पाहता प्राजक्ता पाटील यांची निवड निश्चित मानले जाते. फार मोठा चमत्कार झाला तरच अनगरमध्ये वेगळा निकाल लागू शकतो.
महाविकास आघाडीच्या सरकारच्या म्हणजे १४ सप्टेंबर २०२१ रोजी अनगरला नगरपंचायत (Nagar Panchayat) घोषित करण्यात आली होती. कोविड आणि त्यानंतरच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठल्याच निवडणूक होऊ शकल्या नव्हत्या, त्यामुळे अनगर नगरपंचायतीची निवडणूक अस्तित्वात आल्यानंतर प्रथमच होत आहे. त्यामुळे पहिली निवडणूक आणि नगराध्यक्षपदाबाबत उत्सुकता आहे.
अनगर नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदाचा बहुमान हा राजन पाटील यांच्या धाकट्या सूनबाई प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांना मिळणार असून त्यांनी आज (ता. ११ नोव्हेंबर) आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन मुळीक यांच्याकडे सादर केला आहे, त्यामुळे नगराध्यक्षपदाचा बहुमान कोणाला मिळणार, या सर्वांच्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे.
प्राजक्ता पाटील यांच्यासोबत प्रभाग क्रमांक १४ मधून नारायण कल्याण गुंड यांचा, तर प्रभाग आठमधून वैशाली विष्णु पाचपुंड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून बिनविरोधची परंपरा असणाऱ्या अनगरची नगरपंचायत झाली असून नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे.
माजी आमदार राजन पाटील यांच्या धाकट्या सूनबाई प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांनी आज (ता. ११ नोव्हेंबर) नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्या उच्चशिक्षित बी कॉम एलएलबी आहेत. लोकनेते (स्व.) बाबुरावअण्णा पाटील अनगरकर यांनी अनगरसह वाड्यांची एकजूट बांधून ठेवली ती आजपर्यंत माजी आमदार राजन पाटील, विक्रांत पाटील आणि अजिंक्यराणा पाटील यांनी कायम ठेवली आहे. नगराध्यक्षांसह नगरसेवक निवडण्याचे सर्वाधिकार माजी आमदार राजन पाटील यांना नागरिकांनी दिल्याचे माजी सरपंच भागवत शिंदे यांनी सांगितले.
Q1: अनगर नगरपंचायतीची निवडणूक पहिल्यांदाच का होत आहे?
A1: अनगरला 2021 मध्ये नगरपंचायत घोषित करण्यात आले असून ही तिची पहिली निवडणूक आहे.
Q2: नगराध्यक्षपदासाठी कोण उमेदवार आहेत?
A2: प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील ह्या उमेदवार आहेत.
Q3: नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे?
A3: हे पद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे.
Q4: प्राजक्ता पाटील कोण आहेत?
A4: त्या माजी आमदार राजन पाटील यांच्या धाकट्या सूनबाई असून बी.कॉम व एलएलबी पदवीधर आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.