Angar Upper Tehsil : माजी आमदार राजन पाटील यांना दणका; अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याचा हायकोर्टाचा आदेश

Mohol Political News : अनगर अप्पर तहसील कार्यालयासंदर्भात महाराष्ट्र सरकारने 24 जुलै 2024 रोजी काढलेला अध्यादेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींनी आज रद्द केला आहे.
Yashwant Mane-Rajan Patil
Yashwant Mane-Rajan Patil Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 17 February : मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि तत्कालीन आमदार यशवंत माने यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रतिष्ठा पणाला लावून अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करून आणले. अनगर अप्पर तहसील कार्यालयासंदर्भात राज्य सरकारने काढलेला अध्यादेश मुंबई उच्च न्यायालयाने आज (ता. १७ फेब्रुवारी) रद्द केला आहे. या कार्यालयाची निर्मिती करण्यासाठी जमीन महसूल संहितेचे पालन न केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे.

अनगर अप्पर तहसील कार्यालयासंदर्भात (Angar Upper Tehsil office) महाराष्ट्र सरकारने 24 जुलै 2024 रोजी काढलेला अध्यादेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींनी आज रद्द केला आहे. जमीन महसूल संहिता सेक्शन चारचे पालन न केल्याचा ठपका ठेवून न्यायालयाने आज अनगर अप्पर तहसील कार्यालयासंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय रद्दबातल ठरवला आहे.

भविष्यात अशा पद्धतीने अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करायची असेल, तर विहित प्रचलित कायद्याचे पालन करावे, अशी ताकीदही उच्च न्यायालयाने (High court) राज्य सरकारला केली आहे, त्यामुळे राज्य सरकारने चार महिन्यांपूर्वी घेतलेला निर्णय रद्द झाल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही नामुष्की ओढावली आहे.

Yashwant Mane-Rajan Patil
Dhas-Munde Meeting : बावनकुळेंनी सुरेश धसांना पुन्हा उघडे पाडले; म्हणाले, ‘धनंजय मुंडेंसोबत 28 दिवसांपूर्वीच भेट झालीय...’

अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात मोहोळ तालुक्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी मोहोळ तालुका संघर्ष बचाव समितीच्या झेंड्याखाली एकत्र आले होते. तसेच, शिवसेना नेते सोमेश क्षीरसागर, संतोष पाटील, तसेच काही वकिलांच्या माध्यमातून अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायायलात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने अनगर अप्पर तहसील कार्यालयाचा राज्य सरकारचा अध्यादेश रद्द केला आहे.

तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनगर अप्पर तहसील कार्यालयास मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर १२ सप्टेंबर २०२४ पासून अनगर अप्पर तहसील कार्यालयाचे कामकाज सुरू झाले होते. त्या वेळी सर्वपक्षीयांचा विरोध मोडीत काढून यशवंत माने आणि राजन पाटील यांनी मोठ्या अट्टाहासाने अनगरला तहसील कार्यालय सुरू केले होते.

Yashwant Mane-Rajan Patil
Ajit Pawar On Munde Resign : मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत अजितदादांचा धनंजय मुंडेंना सूचक इशारा; म्हणाले, ते तर काय हे बघत नाहीत का’?

अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात सर्वपक्षीयांनी एकत्र येत मोहोळमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. तसेच, विविध प्रकारची आंदोलनेही करण्यात आली होती. राजन पाटील, यशवंत माने आणि सर्वपक्षीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले होते. विशेषतः यशवंत माने आणि उमेश पाटील यांच्यात एकेरीवर येत वाद झाला हेाता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com