Kolhapur Political News : राधानगरीत नेत्यांचे मनोमिलन; कार्यकर्ते मात्र संभ्रमात

Kolhapur Lok Sabha Latest Politics : प्रकाश आबिटकर , के. पी. पाटील आणि खासदार संजय मंडलिक हे महायुतीत एकत्र आलेत मात्र दुसऱ्या फळीतील नेते आणि कार्यकर्ते यांची मने जुळलीत का? हे येणाऱ्या 4 जूनच्या निकालात स्पष्ट होणार आहे.
Prakashrao Abitkar, K P Patil
Prakashrao Abitkar, K P Patil Sarkarnama

Kolhapur News : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राधानगरीतील प्रमुख नेते महायुतीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. एरवी कारखान्यापासून ते विधानसभेच्या निवडणुकीत एकमेकांवर तोंडसुख घेऊन आरोप प्रत्यारोप करणारे नेतेच एकत्र आल्याने कार्यकर्त्यांची मात्र गोची निर्माण झाली आहे. आमदार प्रकाश आबिटकर Prakashrao Abitkar, माजी आमदार के. पी. पाटील K P Patil आणि खासदार संजय मंडलिक Sanjay Mandlik हे महायुतीत एकत्र आलेत. मात्र, दुसऱ्या फळीतील नेते आणि कार्यकर्ते यांची मने जुळलीत का? हे येणाऱ्या 4 जूनच्या निकालात स्पष्ट होणार आहे. kolhapur loksabha Election 2024

विधानसभा निवडणूक Vidhan Sabha Election असो की बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक. जिल्हा परिषद निवडणूक असो की, पंचायत समितीची निवडणूक. अत्यंत टोकाची भाषणे आणि ईर्ष्येने होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत अबिटकर यांचा गट आणि पाटील यांच्या गटात नेहमीच टोकाची ईर्ष्या पाहायला मिळते. त्यात नुकतीच झालेल्या बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत खासदार संजय मंडलिक Sanjay Mandlik यांनी आमदार प्रकाश आबिटकर Prakashrao Abitkar यांच्या गटाला साथ दिल्याने पाटील यांची देखील मंडलिक यांच्यावर नाराजी आहे.

मात्र, महायुती म्हणून ही नाराजी दूर करून पाटील गटाने संजय मंडलिक यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ Hasan Mushrif यांच्या मध्यस्थीने पाटील यांनी मंडलिक यांच्या प्रचाराला सुरुवात केली असली तरी कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहेच. शिवाय अंतर्गत नाराजीदेखील आहे. हीच नाराजी मेळाव्याच्या माध्यमातून दिसून आली. पाटील यांनी घेतलेल्या मेळाव्यात मंडलिक यांचे चिन्ह कुठेच न दिसल्याचे चित्र होते. त्यावरून नेत्यांचे मनोमिलन झाले असेल तर कार्यकर्त्यांची झाले आहे का हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. Kolhapur local politics

Prakashrao Abitkar, K P Patil
Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूरची निवडणूक सोशल मीडियावरही तापली; मंडलिक-शाहू महाराज समर्थकांंमध्ये ‘सोशल वॉर’

जिल्हा परिषदेला वीरेंद्र मंडलिक Virendra Mandlik आणि जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील यांना एकमेकांच्या विरोधात लढावे लागले होते. यात वीरेंद्र मंडलिक यांचा पराभव झाला होता. शिवाय शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीण सिंह पाटील आणि गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील Ranjitsingh Patil यांचा संघर्ष जिल्ह्याने पाहिला आहे. तर माजी आमदार प्रकाश आबिटकर Prakashrao Abitkar यांचा गट आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हेदेखील बिद्री कारखाना आणि ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढले आहेत. असे असताना या दुसऱ्या फळ्यातील नेत्यांची मनोमिलन खऱ्या अर्थाने झाले आहे का हे पाहणे महत्त्वाचे आहे. latest political news in Kolhapur

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मुदाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी राधानगरी-भुदरगड तालुक्यात भव्य मेळावा घेतला. मात्र, या मेळाव्यात चारही बाजूला राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ चिन्हाचे बैनर लावले होते. महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांचे धनुष्यबाण चिन्ह असलेले एकही बॅनर मेळाव्याच्या ठिकाणी नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत मंडलिक यांचे चिन्ह गायब असल्याची चर्चा सर्वत्र झाली. Loksabha Election Latest Update

R

Prakashrao Abitkar, K P Patil
Sujay Vikhe Patil: आमदार जगताप बरोबर, तरी खासदार विखेंना अनिलभैय्या स्मरतात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com