Prakash Ambedkar : संभाजीराजेंच्या वैचारिकतेशी आमचं जुळत नाही; आंबेडकरांचा तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न फसला

Commentary on Prakash Ambedkar role of Sambhaji Raje Chhatrapati : वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरमधून आरक्षण बचाव यात्रेला सुरवात केली. संभाजीराजे छत्रपतीविषयींच्या भूमिकेवर जुळणार नसल्याने तिसऱ्या आघाडीच्या भवितव्यावर मोठे भाष्य केले.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आज कोल्हापुरातून आरक्षण बचाव यात्रेला सुरवात केली. या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल भूमिकेचा खरपूस शब्दात समाचार घेतला. मध्यंतरीच्या काळात स्वराज्य संघटना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार, अशा चर्चा होत्या.

वंचित स्वराज्य बरोबर जाणार का? याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले. त्यासोबत राज्यातील तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना, डॉ. आंबेडकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर देखील ताशेरे ओढले आहेत.

विशाळगड पयथ्याशी झालेल्या हिंसाचार प्रश्नावर डॉ. आंबेडकर यांनी, दोन समाजात तेढ निर्माण करून आपल्या समाजातील मत मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हिंदू-मुस्लिम दंगल घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच प्रश्नाचा धागा पकडत, संभाजीराजे यांनी केलेल्या आंदोलनावर बोलताना, "संभाजीराजे (Sambhaji Raje) यांची वैचारिक भूमिका वेगळी आहे. त्यांच्यासोबत आघाडी करण्यास आम्ही उत्सुक नाही. ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहत नाहीत. त्यांना आम्ही ऑफर दिली होती. पण जिथं वैचारिकता जमली नाही, म्हणून आम्ही थांबलो", अशा शब्दात डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी राजे छत्रपती यांच्या समाचार घेतला.

Prakash Ambedkar
Satej Patil : कोल्हापुरला वाचवण्यासाठी सतेज पाटलांनी गाठले कर्नाटक; थेट मुख्यमंत्र्यांपुढे ठाण मांडले...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी तिसरी आघाडी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या आघाडीत आपण सामील होणार का? यावर डॉ. आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शेट्टी यांच्या या प्रयत्नावर देखील ताशेरे ओढले आहेत. तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न करायचा असेल, तर ते शक्य नाही. विभागवार आघाडी केल्यास त्याचा फायदा होईल. अशी कल्पना मी राजू शेट्टी यांना यापूर्वी दिली आहे. पण आघाडी करण्यापूर्वीच त्यांच्यातून एक जण निघून गेला. आता आघाडी एक व्यक्तीची की पार्टीची, हा विचार होणे गरजेचे आहे. पण राजू शेट्टी हा विचार करताना दिसत नाहीत. शब्दात आंबेडकर यांनी समाचार घेतला आहे.

Prakash Ambedkar
Hasan Mushrif : विधानसभेला बहुरंगी लढतीचे भाकित करणाऱ्या मुश्रीफांचा महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा दावा

राज्यातील स्थिती बेकाबू

लोकसभेचे झालं तिच परिस्थिती विधानसभा निवडणुकीमध्ये होण्याची शक्यता आहे. तशी ओबीसींमध्ये चर्चा आहे. लोकसभेनंतर आत्ताची परिस्थिती चिघळत चालली आहे. पूर्वी राज्यात शरद पवार यांचे सरकार आलं होते. त्यावेळी दंगली झाल्या. आता कोणाची सत्ता येईल हे सांगता येत नाही. बदल हा निश्चित आहे, बदलच्या तोंडावरती या दंगली होत आहेत का? असा प्रश्न आहे. महाराष्ट्रात कुठल्याही वेळी परिस्थिती बेकाबू होण्याची शक्यता आंबेडकर यांनी वर्तवली. अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीने आरक्षण बचाव यात्रा सुरू केली आहे. आजच्या दिवशी शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केली होती, म्हणून आजपासून आम्ही आरक्षण बचाव यात्रा सुरू केल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

OBC चे 100 आमदार निवडून यावेत

आरक्षणाच्या प्रश्नावर रक्तपात व्हावा, असं आम्हाला वाटत नाही. तुम्हाला नाही, तर कोणालाच नाही, या मनोज जरांगे यांच्या वाक्यातून अनेक अर्थ निघू लागले आहेत. त्यातले काही अन्वयार्थ वास्तव्यात येतील अशी परिस्थिती असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. OBC ना आता भीती वाटू लागली आहे. ही भीती दूर करण्यासाठी OBC चे 100 आमदार निवडून आले पाहिजेत, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com