Prakash Ambedkar On Raju Shetti : वंचितकडून राजू शेट्टींना ऑफर; विधानसभेला 'मविआ'साठी धोक्याची घंटा?

Vanchi Bahujan Aghadi Alliance Swabhimani Shetkari Sanghatna : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वंचित आणि शेतकरी संघटना एकत्र येत आपली 'व्हूवरचना' आखण्याच्या मनस्थितीत आहे.
prakash ambedkar raju shetti
prakash ambedkar raju shettisarkarnama

Kolhapur News : लोकसभेला 'बॅकफूट'वर गेलेली स्वाभिमान शेतकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडीला उर्जितावस्था देण्यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीला बळ देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. अशी शक्यता निर्माण झाली आहे.

त्याबाबत वंचित बहुजन आघाडीतील ( Vanchit Bahujan Aghadi ) मधल्या फळीतील नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, राजू शेट्टी ( Raju Shetti ) यांच्याशी चर्चा केली आहे. मात्र, शेट्टी यांचा सध्या राज्यभर दौरा सुरू आहे. हा दौरा पूर्ण झाल्यानंतर त्याबाबत चर्चा होणार आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ( Raju Shetti ) यांना पराभवाला सामोरे जावे लागले होतं. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने स्वतंत्र उमेदवार दिल्याने शेट्टी यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यातच वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महाविकास आघाडीने युती न केल्यानं हे दोन्ही पक्ष आता विधानसभा निवडणुकीनिमित्ताने एकत्र येण्याच्या तयारीत आहेत.

prakash ambedkar raju shetti
VBA : विधानसभेसाठी वंचित 'ॲक्शन मोड'वर; उमेदवारी निश्चित करण्यास सुरुवात

वंचित बहुजन आघाडीच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, राजू शेट्टी यांच्याशी प्राथमिक चर्चा केली आहे. विधानसभा निवडणुकीत एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती स्वतः शेट्टी यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली आहे.

"वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांच्याबाबत सध्या तरी चर्चा झालेली नाही. सध्या महाराष्ट्रभर माझा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांची संवाद दौरा सुरू आहे. हा दौरा पूर्ण झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र येण्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल," असं शेट्टींनी सांगितलं.

prakash ambedkar raju shetti
VBA : विधानसभेसाठी वंचित 'ॲक्शन मोड'वर; उमेदवारी निश्चित करण्यास सुरुवात

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीपेक्षा जास्त जागा मिळवल्यानंतर राज्यातील राजकारणात मोठे बदल होतील, असे संकेत मिळाले आहेत. यातच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वंचित आणि शेतकरी संघटना एकत्र येत आपली ' व्यूहरचना' आखण्याच्या मनस्थितीत आहे. वंचित आणि शेतकरी संघटना एकत्र आल्यास महाविकास आघाडीला त्याचा फटका बसू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करताना दिसत आहेत.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com