Mangalvedha Assembly Elections : '...त्यामुळे मी देखील 'आमदारीन' होणार' ; प्रणिता भालकेंचं मोठं विधान!

Bhagirath Bhalke News : मंगळवेढा तालुक्यात लोकसभेअगोदर विधानसभा निवडणुकीची वातावरण निर्मिती
Pranita Bhalke
Pranita BhalkeSarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha Taluka Politics लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याअगोदर मंगळवेढा तालुक्यात विधानसभेच्याच निवडणुकीची चर्चा अधिक सुरू आहे. भगीरथ भालके यांच्या पत्नी डॉ. प्रणिता भालके यांनी मी आमदार होणार असल्याचा पुनरुचार तालुक्यातील नंदेश्वर येथे बोलताना व्यक्त केला.

नंदेश्वर येथे नुकतेच पतसंस्थेचे उद्घाटन करण्यात आले त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. तत्पूर्वी सूत्रसंचालकांनीही त्यांचा उल्लेख भावी आमदार असा केल्यानंतर त्या वाक्याचे त्यांनी विश्लेषण करताना या भागात दिवंगत भारत भालके यांचे चांगले संबंध होते, त्यांना मानणारा वर्ग देखील आहे. अशा परिस्थितीत आठ महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भगीरथ भालकेच पुन्हा आमदार होणार आहेत. ज्याप्रमाणे शिक्षकाची पत्नी देखील मॅडम असते, त्याप्रमाणे भगीरथ भालके यांची मी पत्नी असल्यामुळे मी देखील 'आमदारीन' होणार आहे. असा त्यांनी दावा केला. त्यामुळे तालुक्यात लोकसभेच्या अगोदरच विधानसभेची रंगत सुरू झाली.(Mangalvedha Assembly Elections)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pranita Bhalke
Sanjay Raut : खासदार राऊतांनी नगरच्या आमदाराची केली दाऊदशी तुलना; म्हणाले...

विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशानंतर भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत के.सी.आर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला. मात्र तेलंगणात झालेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचा पराभव होऊन सत्ता गेली. तर के.सी.आर हे शारीरिक व्याधीमुळे काही काळ राजकारणापासून दूर होते, त्यामुळे भगीरथ भालके काय पुढे काय करणार याची सर्वांना उत्सुकता होती.

दरम्यान माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील निवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्याला सतर्क राहण्याच्या सूचना देत कामाला लागण्याचे आदेश दिले. तर विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक निधी या मतदारसंघात आल्यामुळे आपणच पुन्हा दावेदार असल्याचा दावा केल्याने, त्यांचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत.

Pranita Bhalke
Tembhu Water Project : टेंभूचं पाणी 'पेटलं' तर गप्प राहणार नाही..! राजेंद्र देशमुखांचा आमदार बाबरांना इशारा...

दरम्यान, हिवाळी अधिवेशनात भगीरथ भालके यांनी मतदारसंघातील प्रश्नसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नागपूर येथे भेट घेऊन हे प्रश्न सोडवण्याबाबत विनंती केली. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी ते प्रवेश करणार का ? याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू आहे. अशा परिस्थितीत के. चंद्रशेखर राव यांनी प्रकृती ठीक झाल्यामुळे पुन्हा लोकसभा निवडणुकीची राजकीय गणिते जुळवण्यात सुरुवात केली. त्यामुळे भगीरथ भालके हे अजित पवार की के.सी.आर यापैकी कोणाला जवळ करणार? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी प्रणिती भालके यांनी भगीरथ भालके हे पुन्हा आमदार होणार असल्याच विश्वास नंदेश्वर येथील नागरिकांना देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com