Tembhu Water Project : टेंभूचं पाणी 'पेटलं' तर गप्प राहणार नाही..! राजेंद्र देशमुखांचा आमदार बाबरांना इशारा...

Sangli Political : बोंबेवाडी येथे टेंभू योजनेचे पाणी माणगंगा नदीत दाखल.
Tembhu Water Project
Tembhu Water ProjectSarkarnama
Published on
Updated on

Tembhu Water Project : आमच्या अनेक वर्षांच्या राजकारणात आम्ही पाण्याचं राजकारण केव्हाच केलं नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती उपयुक्त पाणी दिलेच पाहिजे, काही मंडळींकडून टेंभूच्या पाण्याचे राजकारण केले जात आहे. मात्र राजकारणात टेंभूचे पाणी गप्प बसणार नसल्याचा इशारा माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी आमदार अनिल बाबर यांचे नाव न घेता दिला. (Tembhu Water Project)

बोंबेवाडी येथे टेंभू योजनेचे पाणी माणगंगा नदीत दाखल झाले. त्यानिमित्त माणगंगा नदीत पाण्याचे पूजन खासदार संजय पाटील, माजी आमदार राजेंद्र देशमुख, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसवर बैठक झाली. त्यामध्ये टेंभू योजनेबाबत शासकीय अधिकाऱ्यांना या योजनेचे राजकारण करून नका, अशा सूचना देण्यात आल्या.

Tembhu Water Project
Gondia Zilla Parishad : बांधकाम, आरोग्य विभागाला राजशिष्टाचाराचा विसर

यावेळी देशमुख म्हणाले, अलिकडचे राजकारण बदलत चालले आहे. यापूर्वी कधी पाण्याचे राजकारण झाले नव्हते. आम्ही पाण्याबाबत राजकारण केव्हाच केले नाही. मात्र सध्या टेंभूच्या पाण्यासाठी चांगलेच राजकारण होत असून ही बाब भूषणावह नाही. स्वतःच्या स्वार्थापेक्षा लोकांसाठी पाणीप्रश्न महत्त्वाचा आहे. काही मंडळींकडून टेंभूचे पाणी अडवण्याचे प्रकार झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र टेंभूचे पाणी पेटलं तर कदापि गप्प राहणार नसल्याचा इशारा आमदार अनिल बाबर यांचे नाव न घेता देशमुख यांनी दिला आहे. यावेळी खासदार संजय पाटील म्हणाले, एका वाघाने पंधरा दिवस कारखाना चालवला. त्यामध्ये त्यांना पंधरा कोटी तोटा झाला. पंचवीस वर्षे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी माणगंगा साखर कारखाना चालवला, त्यामुळे त्यांना तोटा झाला.

देशमुख यांची प्रामाणिक भूमिका असल्यामुळे त्यांना त्रास झाला, परंतु ते दिवसही बदलायला वेळ लागणार नाही. येणाऱ्या काळात नक्कीच तुम्हाला बदल झालेले दिसतील. यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, श्रीरंग कदम, प्रमोद शेंडगे, विलास काळेबाग, महादेव पाटील, प्रणव गुरव तसेच शेतकरी उपस्थित होते.

(Edited by Amol Sutar)

R...

Tembhu Water Project
LokSabha Election 2024 : माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे नाव अचानक चर्चेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com