Solapur Politic's : प्रणिती शिंदेंसाठी काँग्रेसचे सोलापुरात दुहेरी डावपेच; 'दक्षिण'मध्ये माजी मंत्र्यांच्या पराभवासाठी ‘धनगर कार्ड’

सोलापूर लोकसभेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याऐवजी त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव पुढे आले आहे.
Chetan Narote-Praniti Shinde
Chetan Narote-Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्यातूनच सोलापूर लोकसभेसाठी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याऐवजी आमदार प्रणिती शिंदे यांना रिंगणात उतरविण्याची तयारी पक्षाकडून सुरू आहे. लोकसभेला अपयश आले तर विधानसभेला शहर मध्य हा त्यांना हक्काचा मतदारसंघ असणार आहे. त्याचबरोबर, दक्षिण सोलापूर मतदारसंघातील धनगर समाजाची संख्या पाहता शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उमेदवारीचा विचारही पक्षाकडून होऊ शकतो. (Praniti Shinde is likely to be nominated by Congress for Solapur Lok Sabha)

माढा आणि सोलापूर (Solapur) लोकसभेवर (Loksabha) सध्या भाजपचे वर्चस्व आहे. मात्र, भाजपकडून (BJP) सोलापूर लोकसभेचा उमेदवार बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नवख्या उमेदवाराला संधी देण्याची चर्चा पक्षात सुरू आहे. काँग्रेसने (Congress) राजकीय डावपेच आखायला सुरुवात केली आहे. त्यातूनच सोलापूर लोकसभेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याऐवजी त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव पुढे आले आहे. भाजपचा पराभव त्याच करू शकतात, असा विश्वास काँग्रेसला वाटतो आहे. लोकसभा निवडणुकीत जरी यश मिळाले नाही तर सोलापूर शहर मध्य हा त्यांचा हक्काचा मतदारसंघ विधानसभेसाठी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या राजकीय डावपेचाची चर्चा शहरात रंगली आहे.

Chetan Narote-Praniti Shinde
Irshalwadi Landslide Helpline: इर्शाळवाडी दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू, २१ जखमी; चिखलामुळे मदतकार्यात अडथळे, मदतीसाठी हेल्पलाईन

राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपसोबत जाऊन अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत लोकसभेची निवडणूक एप्रिल २०२४ मध्ये होण्याची शक्यता आहे. राज्यातून मागील निवडणुकीप्रमाणे भाजपला यश अपेक्षित आहे. त्यातूनच नवखे उमेदवार देण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे.

Chetan Narote-Praniti Shinde
What Happened in Malin : माळीणमधल्या घटनेची ती रात्र डोळ्यांपुढे आली...

भाजप आणि मित्रपक्षाची तयारी सुरू असताना काँग्रेसही निवडणूक रणनीतीच्या मैदानात उतरली आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मदतीने ते डावपेच आखत आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर लोकसभेची निवडणूक लढवली जाणार आहे. भाजपकडून ही जागा परत घेण्यासाठी काँग्रेसला आमदार प्रणिती शिंदे या हुक्कमाचा एक्का पक्षाला वाटत आहेत, त्यामुळेच त्यांना लोकसभेला उतरविण्याचा विचार काँग्रेसकडून केला जात आहे.

कोणतीही शैक्षणिक संस्था, साखर कारखाना नसतानाही सर्वसामान्यांशी असणार कनेक्ट यामुळे मोदी लाटेतही आमदार प्रणिती शिंदे यांनी ‘शहर मध्य’ विधानसभा मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक साधली आहे. हाच धागा पकडून आता सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदेंचे नाव काँग्रेसकडून आघाडीवर आहे. भाजपच्या उमेदवाराचा पराभव त्याच करू शकतात, असा पक्षश्रेष्ठींना विश्वास वाटत आहे.

Chetan Narote-Praniti Shinde
Amit Shah On Irshalgad Incident: इर्शाळवाडी दुर्घटनेची अमित शहांनी घेतली दखल, मुख्यमंत्री शिंदे चर्चा करत मदतीचं आश्वासन!

काँग्रेस-भाजपचे धनगर कार्ड

धनगर मतदारांची संख्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात निर्णायक आहे. समाजाची संख्या शहरातही लक्षणीय आहे. त्यातूनच नरेंद्र काळे यांना शहराध्यक्षपदी संधी भाजपने दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संपर्क आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचे समर्थक असलेले पदाधिकारी म्हणून नरेंद्र काळे यांची ओळख आहे. काँग्रेसनेही शहराध्यक्षाची जबाबदारी चेतन नरोटे यांच्या खांद्यावर टाकलेली आहे. सोलापूर शहरालगतच्या दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर व मोहोळ मतदारसंघात त्यांचा प्रभाव पडू शकतो, असा दोन्ही पक्षांना विश्वास आहे.

Chetan Narote-Praniti Shinde
Irshalwadi Landslide Incident: इर्शाळवाडीवर दरड कोसळली ; शंभरहून अधिक लोक अडकल्याची भीती; दहा जणांचा मृत्यू

चेतन नरोटेंना दक्षिणमधून उमेदवारी शक्य

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात धनगर मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. साधारणत: तीन लाख मतदार या मतदारसंघात आहेत. मराठा समाजापाठोपाठ या मतदारसंघात मुस्लिम समाज देखील लक्षणीय आहे. सुभाष देशमुख यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ८७ हजार २३३, तर काँग्रेसकडून प्रथमच विधानसभेच्या रिंगणात उतरलेले माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांना ५८ हजार मते मिळाली होती. दक्षिण सोलापूरमध्ये भाजपला हरविण्यासाठी आगामी निवडणुकीत काँग्रेस धनगर समाजाचा उमेदवार देऊ शकते. त्यासाठी सर्वाधिक पसंती काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना मिळू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com