Mahesh Kothe : महेश कोठेंना नेमकं लढायचं कुठून....सोलापूर शहर उत्तर की शहर मध्य?

Maharashtra Assembly Election 2024 महेश कोठे यांनी सोलापूर शहर उत्तरऐवजी शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी दाखवली आहे, त्यामुळे महेश कोठेंना नेमकं कुठून लढायचं आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Mahesh Kothe
Mahesh Kothe Sarkarnama

Solapur, 16 june : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रणिती शिंदे यांच्या विजयामुळे महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यातूनच काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ काँग्रेसकडे घ्यावा, असे साकडे खुद्द ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंना घातले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूरचे प्रमुख महेश कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहर उत्तरऐवजी आम्हाला सोलापूर शहर मध्य मतदारसंघ मिळाला, तर या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची आमची तयारी आहे, अशी गुगली टाकली आहे. त्यामुळे महेश कोठेंना (Mahesh Kothe) नेमकं कुठून लढायचं आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सोलापूर (Solapur) शहरातील तीन मतदारसंघांपैकी सोलापूर शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर हे दोन मतदारसंघ काँग्रेसकडे (Congress) आहेत, तर सोलापूर शहर उत्तर हा मतदारसंघ मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) सोडण्यात आलेला आहे. हे सूत्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीतील आहे. आता सोलापूरमधील विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अंगात उत्साह संचारला आहे, त्यातून सोलापूर शहर उत्तर मतदारसंघावरही (Solapur City North ) दावा सांगण्यात येत आहे.

वास्तविक, या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख महेश कोठे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी चालवली आहे. यापूर्वी त्यांनी २००९ मध्ये सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना ५२ हजार २५३ मते मिळाली होती, तर भाजपचे विजयकुमार देशमुख यांना ६२ हजार ३६३ मते मिळाली हेाती. कोठे यांचा अवघ्या दहा हजार मतांनी पराभव झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे यांनी अपक्ष निवडणूक लढवून साडेचौदा हजार मते मिळविली होती. सपाटेंनी बंडखोरी केली नसती तर कोठे २००९ मध्येच आमदार झाले असते.

आता सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून प्रणिती शिंदे ह्या सुमारे ३६ हजार मतांनी पिछाडीवर आहेत, तर सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून शिंदे यांना निसटते ७९६ मतांचे लीड आहे. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात महेश कोठे यांना वैयक्तिक पातळीवर मानणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. शिवाय कोठे हे आजपर्यंत याच मतदारसंघातून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. तसेच, सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडकाम, भाजपविरोधातील असंतोष, मतदारसंघाच्या आमदारांविरोधात तयार होणारी ॲन्टीइन्कबन्सी या गोष्टी महेश कोठे यांच्या पथ्यावर पडू शकतात.

Mahesh Kothe
Praniti Shinde Mangalvedha Melava : पंढरपूरमध्ये झालेली चूक प्रणिती शिंदेंनी मंगळवेढ्यात सुधारली!

महेश कोठे यांची संपूर्ण बलस्थाने शहर उत्तरमध्ये आहेत. मात्र, त्याच मतदारसंघासाठी काँग्रेसचा आग्रह दिसून येत आहे. त्यावर प्रतिक्रिया महेश कोठे यांनीही प्रतिक्रिया दिला आहे. काँग्रेसचे सुनील रसाळे कोठे परिवाराचे हितचिंतक आहेत. त्यांना वाटत असेल की सोलापूर शहर मध्य मतदारसंघ महेश कोठे हे सहजपणे जिंकू शकतील. कारण या मतदारसंघातून मी मागील दोन निवडणुकीत अपक्ष लढूनही तीस हजारपेक्षा अधिक मते घेतली आहेत, त्यामुळे आमची सोलापूर शहर मध्य मतदारसंघातूनही निवडणूक लढविण्याची तयारी आहे, असे महेश कोठे यांनी स्पष्ट केले.

सोलापूर शहर मध्य मतदासंघातून प्रणिती शिंदे या आमदार होत्या. मात्र, त्या ठिकाणी काँग्रेसकडून नवा चेहरा द्यावा लागणार आहे. पण, राष्ट्रवादीचे महेश कोठे यांनीही शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. मागील २०१९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कोठे यांनी तीस हजारपेक्षा अधिक मतदान घेतले आहे. त्यामुळे कोठे यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, माजी आमदार नरसय्या आडम यांनीही याच मतदारसंघातून रणशिंग फुंकले आहे, त्यामुळे मतविभागणीची धोका आहे.

Mahesh Kothe
BJP Vs Shivsena : भाजपने मैत्रीच्या नावाखाली आमचे उमेदवार पाडले, ते आमच्या लक्षात आलं नाही; शिवसेना नेत्याची खंत

महेश कोठे यांनी आपले स्ट्राँगव्होल्ड असलेला शहर उत्तरऐवजी शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी का दाखवली असावी, अशी चर्चा आता होत आहे. सध्याचे वातावरण आणि मतदारसंघातील समाजिक समीकरणे पाहून तर महेश कोठे यांनी ही तयारी दाखवली नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, कोठे यांच्या भूमिकेची सोलापूरमध्ये चर्चा रंगली आहे.

Mahesh Kothe
Kalyan Kale Vs Raosaheb Danve : खासदार काळेंनी दंड थोपटले, तिथेच रावसाहेब दानवेंचा आज दौरा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com