Solapur Politics : प्रणिती शिंदेंची राणे, टी. राजाला वाॅर्निंग; ‘खबरदार... भांडणं लावण्याचा प्रयत्न कराल तर’

Praniti warning to Rane, T. Raja : हिरेहब्बू वाड्यात नंदीध्वजाच्या पूजनानंतर सोलापुरात सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात झाली.
Praniti Shinde
Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : आमदार नीतेश राणे आणि टी. राजासिंह यांच्यासारखे लोक बाहेरून येऊन सोलापूरचे वातावरण खराब करीत आहेत. सोलापूरचे वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न करतात. भांडण लावण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मी ताकीद देते की, खबरदार... आमच्या लोकांमध्ये किंवा देशात कुठेही जाऊन भांडण लावण्याचे किंवा लावालावी करण्याचे प्रयत्न करू नका, अशी ताकीद आमदार प्रणिती शिंदे यांनी राणे आणि टी. राजा यांच्यासह विरोधकांना दिली. (Praniti Shinde's warning to Nitesh Rane, T. Rajashinh)

हिरेहब्बू वाड्यात नंदीध्वजाच्या पूजनानंतर सिद्धरामेश्वराच्या गड्डा यात्रेला सोलापुरात सुरुवात झाली. हिरेहब्बू वाड्यात दर्शनासाठी आल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, काही लोक बाहेरून येऊन सोलापूरचे वातावरण खराब करीत आहेत. ह्या लोकांनी गोरगरिबांची कामे करावीत. धर्माचे नाव वापरून लोकांमध्ये भांडण लावण्याची ही कुठली पद्धत आहे. हे देशात आधी कधीच झालेले नव्हते, असं जर कोण करीत असेल तर खबरदार....

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Praniti Shinde
Shahajibapu Patil News : शहाजीबापूंचे पाय धुऊन पाणी पिण्याची भाजप पदाधिकाऱ्याची घोषणा; असं काय घडलं?

सोलापूरचे वातावरण बिघडणार नाही. कारण येथील जनता ही सुज्ञ आहे. आता लोकांनाच कळून चुकलं आहे. या लोकांचे कटकारस्थान काय असते आणि या लोकांची रणनीती काय असते. निवडणुकीच्या तोंडावर लोकांमध्ये धर्म-जातपातीच्या नावावर फूट पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र भारताचे लोक एवढे मूर्ख नाहीत, असेही प्रणिती यांनी म्हटले आहे.

आमदार शिंदे म्हणाल्या की, हिरेहब्बू वाड्यात नंदीध्वजाच्या पूजनानंतर शंखवादन करण्यात आले. त्यावर प्रणिती म्हणाल्या की, वाह...ऽऽ ही तर खरी महाराष्ट्राची परंपरा आहे. एका अर्थाने रणशिंग फुंकले, असे आपण समजू. सोलापूरची यात्रा ही केवळ सोलापूरची नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राची ती परंपरा आहे. सोलापूर जिल्हा हा अतिशय भाग्यशाली आहे. कारण इथेच विठ्ठल, इथेच सिद्धरामेश्वर आणि बाजूलाच आई तुळजाभवानी आहे.

Praniti Shinde
Modi-Fadanavis Dressing : नरेंद्र-देवेंद्र 'एक रंग में रंग जाए' : नाशिकमध्ये मोदी-फडणवीसांच्या जॅकेटची चर्चा!

हे २०२४ चे वर्ष निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. या देशाला आणि राज्याला गोरगरिबांकडे बघणारं स्थिर सरकार मिळू दे, अशी सिद्धारामेश्वराकडे प्रार्थना करते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मिलिंद देवरांबाबत अफवा

मिलिंद देवरा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवर प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, मिलिंद देवरा हे शिंदे गटात जाणार, ही एक मोठी अफवा आहे. विरोधक त्यांच्याबाबत नेहमी अफवा पसरवतात. हे जातात ते जातात असं सांगितलं जातं. विरोधकच अशा अफवा उठवतात, यात काहीही तथ्य नाही, असा दावाही त्यांनी केला.

Praniti Shinde
Modi Vs Shinde : मोदींच्या दौऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही; सुशीलकुमार शिंदेंनी फुंकले रणशिंंग

वडेट्टीवार यांच्याबाबत अशी अफवा पसरली आहे. काँग्रेस पक्षात सर्वांना मान-सन्मान दिला जातो. काँग्रेस हा लोकशाही जिवंत असलेला पक्ष आहे. हा हुकूमशाहीचा पक्ष नाही, हम बोले सो कायदा म्हणणारा, असा कोणता पक्ष आहे, हे तुम्हाला माहिती आहे, असेही प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.

...तर आम्हीही मोदींच्या स्वागताला जाऊ

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १९ जानेवारी रोजी सोलापुरात येत आहेत. पंतप्रधानांचे स्वागत हे त्यांच्याच पक्षातील लोक करतील. स्वागत करण्यासारखं त्यांनी काही काम केलं असतं, तर आम्हीदेखील मोदींचे स्वागत करू, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

Edited By : Vijay Dudhale

R...

Praniti Shinde
Solapur News : भाजपवाले यापुढे मतदानही होऊ देतील की नाही, ही शंकाच : काँग्रेस नेत्याने व्यक्ती केली भीती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com