Praniti Shinde's Property : प्रणिती शिंदेंच्या संपत्तीत पाच वर्षांत पावणे दोन कोटींची वाढ; अवघे 300 ग्रॅम सोने

Solapur Lok Sabha Election : प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात चार कोटी 70 लाख 27 हजार 210 रुपयांची मालमत्ता दर्शविली होती.
Praniti Shinde
Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 18 April : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आज शक्तिप्रर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार २०१९ च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत पाच वर्षांत एक कोटी ८१ लाख ४२ हजार १९२ रुपयांची वाढ झाली आहे. त्यांच्याकडे एकूण सहा कोटी ६० लाख ७० हजार ४०२ रुपयांची मालमत्ता आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उज्ज्वला शिंदे आणि महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत रॅली काढून आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात शिंदे यांनी आपल्या संपत्तीचे विवरण दिले आहे.

Praniti Shinde
Ajit Pawar-Harshvardhan Patil : भाजपच्या मेळाव्यानंतर अजितदादा-हर्षवर्धन पाटील यांच्यात डिनर डिप्लोमसी!

प्रणिती शिंदे यांनी सोलापूर (Solapur) शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात चार कोटी ७० लाख २७ हजार २१० रुपयांची मालमत्ता दर्शविली होती. आता लोकसभा निवडणुकीसाठी भरलेल्या अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे सहा कोटी ६० लाख ७० हजार ४०२ रुपयांची मालमत्ता तथा संपत्ती असल्याचे दिसून येते.

प्रणिती शिंदे यांनी आपल्या नावावर एकही दुचाकी, चारचाकी नाही, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यांच्या बॅंकांमधील ठेवी तथा रक्कम २०१९ च्या तुलनेत सुमारे ३० लाख रुपयांनी कमी झाली आहे. तसेच, आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावावर एकाही बॅंकेचे कर्ज नसल्याचे या प्रतिज्ञापत्रात म्हटलेले आहे.

Praniti Shinde
Loksabha Election : भाजपला धक्का! उत्तम जानकरांचा धैर्यशील मोहिते-पाटलांना पाठिंबा?

चारचाकी अथवा दुचाकी नाही

प्रणिती शिंदेंच्या नावावर एकही दुचाकी अथवा चारचाकी नाही;

जागा, जमीन व दागिन्यांमध्ये कोणतीही वाढ नाही

पाच वर्षांत दागिन्यात वाढ नाही, ३०० ग्रॅम सोने कायम

स्थावर मालमत्तेत एक कोटी ५२ लाख ५४४ रुपयांची वाढ

जंगम मालमत्तेत २९ लाख ३५ हजार ६४८ रुपयांची वाढ

बॅंकांमधील ठेवीत ३० लाखांची घट

२०१९च्या तुलनेत २०२४मध्ये एक कोटी ८१ लाख ४३ हजार १९२ रुपयांनी संपत्ती वाढली

Praniti Shinde
Praniti Shinde : प्रणिती शिंदेंचेही जोरदार शक्तिप्रदर्शन

संपत्ती

- प्रणिती शिंदे यांची शेअर बाजारात सुमारे १२ लाख रुपयांची गुंतवणूक आहे

-शिंदे यांच्या नावावर ५ एकर ७० गुंठे जमीन आहे.

- प्रणिती शिंदेंकडे ३०० ग्रॅम सोने

सोलापूर आणि दादरमध्ये निवासस्थान आहे.

वाहने आणि वैयक्तिक प्रकारचे कोणतेही कर्ज नाही

- बॅंका व टपालमधील ठेवी : ९९.५१ लाख रुपये

Edited By : Vijay Dudhale

Praniti Shinde
Patole on Pawar Family : भाजपनं पवारांच्या घरात भांडण लावलं; नाना पटोलेंचा आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com