Loksabha Election : भाजपला धक्का! उत्तम जानकरांचा धैर्यशील मोहिते-पाटलांना पाठिंबा?

Uttam Jankar : देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उत्तम जानकर हे शरद पवारांच्या भेटीला गेले होते. या भेटीनंतर उत्तम जानकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते.
Uttam Jankar-Dhairyasheel Mohite Patil
Uttam Jankar-Dhairyasheel Mohite PatilSarkarnama

Loksabha Election : माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धैर्यशील यांना माळशिरसमधून त्यांचे विरोधक उत्तम जानकर ( Uttam Jankar ) यांची साथ मिळणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, खास विमानाने देवेंद्र फडणवीस यांनी जानकरांना बोलावून घेतले. त्यामुळे जानकर महायुतीसोबत की महाविकास आघाडीसोबत असा प्रश्न निर्माण झाला होता. शुक्रवारी (ता.19) जानकर आपली भूमिका स्पष्ट करणार होते. मात्र, जानकर धैर्यशील मोहिते पाटील यांना साथ देणार असल्याचे सांगितले जात आहे.

Uttam Jankar-Dhairyasheel Mohite Patil
Jayant Patil News : जयंत पाटलांनी काढला पोलिसांना चिमटा, म्हणाले..!

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतल्यानंतर उत्तम जानकर हे शरद पवारांच्या भेटीला गेले होते. या भेटीनंतर उत्तम जानकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते. शुक्रवारी (ता19) ते आपली भूमिका जाहीर करणार होते. मात्र, आगामी विधानसभेचे गणित लक्षात घेता ते धैर्यशील मोहिते (Dhairyasheel Mohite Patil) यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उत्तम जानकर हे अजित पवार गटात आहेत. 2019 ची लोकसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीकडून लढली होती. भाजपचे राम सातपुते यांच्या विरोधात त्यांना केवळ दोन हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यान, आपण इतकी वर्षे मोहिते पाटलांशी संघर्ष केला. मात्र, विधानसभेला उमेदवारी नाकारून भाजपने आपल्यावर अन्याय केल्याचे उत्तम जानकर म्हणाले होते.

शरद पवार गटाला तसेच धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय हा लोकसभेपुरता असणार असल्याचे उत्तम जानकर यांच्याकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश केला, त्यावेळी जयंत पाटील म्हणाले होते. मला उत्तमराव जानकरांचा फोन आला होता. ते म्हणाले, तुम्ही करताय ते चांगले करताय. आम्ही दोघेही एक होणार आहे. मीही त्यांना साथ देणार आहे. माढ्यासाठी जानकर मोहिते पाटलांना मदत करतील, असेच पाटलांनी तेव्हा सुचवले होते.

R

Uttam Jankar-Dhairyasheel Mohite Patil
Solapur Lok Sabha : माजी खासदारांना सोबत घेऊन फिरायला भाजपला लाज वाटते का?; प्रणिती शिंदेंचा बोचरा सवाल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com