

Solapur, 24 May : तो कोण कुठला प्रसाद लाड, भाजपचा विधान परिषदेचा आमदार, हॉटेलवाला, झाडूपोच्छा करणारा तो मनोज जरांगेंकडे जातो. आमदार प्रसाद लाड हे समाज म्हणून आलो, असं सांगत होते. तर त्यांनी पहिलं आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि काय अक्कल पाजळायची ती पाजळावी. तुम्हीही उपोषणाला बसा...तुम्हाला कोणी अडवलंय, असे आव्हान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिले आहे.
लक्ष्मण हाके म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवरून राज्यातील ओबीसींचं आरक्षण संपवलं आहे. हे काम लोकनियुक्त सरकारने केले आहे. ओबीसीच्या हिताचं संरक्षण करण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं आहे. आमचं म्हणणं काय आहे, हे सरकार ऐकून घ्यायला तयार नाही. जरांगेंनी अंतरवालीत बसून आंदोलनाची घोषणा करायची आणि सरकारचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी जाऊन बेकायदा मागण्या मान्य करून ओबीसींच्या अन्नात माती कालवण्याचं षडयंत्र आखलं जात आहे. म्हणून आम्ही जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहोत.
मनोज जरांगेंच्या मागणीवरून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केला, तर छोट्या जाती कुठं जातील, त्यांच्या हिताचं संरक्षण कोण करेल. आम्ही सामाजिक न्यायाची अपेक्षा ठेवायाची नाही का, त्यामुळे आम्ही ओबीसी जनजागृतीसाठी छोट्या छोट्या १०० सभा घेत आहोत. जरांगेंच्या आंदोलनाशी आम्हाला काय देणं घेणं नाही, असेही हाके यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, तो कोण कुठला लाड, भाजपचा विधान परिषदेचा आमदार, हॉटेलवाला, झाडूपोच्छा करणारा तो जरांगेंकडे जातो. काय कळतंय जरांगे आणि लाड यांना? प्रसाद लाडला पाठवून भाजप सेल्फ गोल करतंय. ही टीनपाट माणसं आहेत. प्रसाद लाड आणि जरागेंना काय नॉलेज आहे. तुम्ही ओबीसींच्या अन्नात माती कालवायला चालला आहात.
दौंडच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे, फलटणच्या सभापती शिवांजली भोसले, कोल्हापूरच्या महापौर रुपराणी निकम, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ प्रिया शिंदे यांच्या जातीच्या बाबत कोणता सामाजिक दुजाभाव झाला असेल. म्हणून या लोकांनी ओबीची दाखले काढून बेकायदा ताबा मारला असेल. ओबीसींचं आक्षरण या सरकारने संपवलं आहे. पुणे, पिंपरी चिंचवड येथील ओबीसी आरक्षण संपलं आहे. इंग्रजांनी जातनिहाय जनगणना केली. पण आमचीच माणसं आम्हाला न्याय देत नाहीत, असेही हाके यांनी स्पष्ट केले.
लोकशाहातील सर्वात सामर्थ्यवान आंदोलन उपोषणाची ताकद कमी केली आहे. इथली न्याय व्यवस्थाही ओबीसींच्या आरक्षणाबाबत टिपण्णी करतेय, हे आम्हाला समजत नाही, अशी खंतही लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.